Alka Kubal : मला तिरडीला बांधलेलं, माझंच मरण स्वतःच्या डोळ्यांनी…अलका कुबल यांनी सांगितला ‘माहेरची साडी’ सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग
Alka Kubal : अलका कुबल यांनी एका मुलाखतीत 'माहेरची साडी' सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचा ‘माहेरची साडी‘ हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात अलका कुबल, विक्रम गोखले, अजिंक्य देव यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमातील कलाकार मुलाखतींमध्ये सिनेमाच्या शूटिंगच्या आठवणी शेअर करतात. अलका कुबल यांनीही ‘माहेरची साडी‘ या सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे.
अलका कुबल यांनी सांगितला प्रसंग
अलका कुबल म्हणाल्या की, ‘मी पण हा जेव्हा सिनेमा पाहते तेव्हा खूप रडते. मला तेव्हा वाटतच नाही की, त्या सिनेमात मीच होते. मी त्या सिनेमाचा कथानकात इतकी बुडून जाते की मला समजतच नाही, माझ्याही डोळ्यातून पाणी येतं. या सिनेमातल्या एका सीनमध्ये मी तिरडीवर झोपणार होते. असला काहीसा सीन मी आयुष्यात पहिल्यांदाच करत होते. तेव्हा मला आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की, असा असा एक सीन आहे, तुला हे हे करावं लागेल. साधारण तीन चार तासात हा सीन संपेल. कारण, मी त्या सीनमध्ये तिरडीवर मृत अवस्थेत असले तरीही इतरांचे डायलॉग होते.’
‘त्यावेळी मला बांधलेलं, डोळ्यांवर ऊन येऊ नये म्हणून वरती छत्री धरलेली, मी फक्त झोपून होते, सगळ्यांकडे बघत होते छान एन्जॉय करत होते. पण नंतर त्या दिवशी नेमकं सगळ्या सूर्यप्रकाश जाऊन वातावरण ढगाळ झालं. त्यामुळे सगळी कंटिन्युटी होती ती बिघडली. मग मला आमचे कॅमेरामन म्हणाले की, अलका सॉरी तुला उद्या पुन्हा एकदा तिरडीवर झोपावं लागेल. त्यावर मी त्यांना म्हणाले की, चालेल मला काहीही प्रॉब्लेम नाही. मी आजचा सीन मस्त एन्जॉय केला आहे. पण दुसऱ्या दिवशी मात्र सीन शूट करताना मला त्या तिरडीवर झोपायला होत नव्हतं. कारण, काल घातलेली सर्व फुलं अबीर गुलाल तसंच होतं. त्यावेळी मला वाटलं की, मी माझंच मरण स्वतःच्या डोळ्यांनी बघते की काय! त्यावेळी मला त्या तिरडीवर झोपवेना. पण दुसऱ्या दिवशी तो सीन मी पटापट संपवला.’
‘मला या सिनेमामुळे प्रेक्षकांचे प्रचंड अनुभव आले. मी त्यावेळी वेगवेगळ्या जत्रांमध्ये माझ्या फिल्म्स लावायचे. तिथे जायचे तेव्हा बायका अगदी डोळ्यात पाणी घेऊन यायच्या. पण या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट मी आमच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना देईन. सुरुवातीला बजेटमुळे मी हा सिनेमा स्वीकारत नव्हते. पण, पितांबर काळे यांनी मला नीट समजावलं की अलका ही संधी सोडू नकोस. बाहेर तुला भरपूर पैसे वगैरे मिळत असतील. पण, हा चान्स तू सोडू नये असं मला वाटतं.’ असं अलका यांनी शेवटी सांगितलं. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल बोलत होत्या.