‘काहीतरी चुकीचं…’, अलका याज्ञिक यांच्या दुर्मीळ आजारावर सेलिब्रीटींची प्रतिक्रिया

Singer Alka Yagnik | अचानक अलका याज्ञिक यांना ऐकायला येणं झालं बंद..., 'या' गंभीर आजाराचा शिकार झाल्या आहेत अलका याज्ञिक, सेलिब्रिटींनी देखील व्यक्त केली चिंता..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अलका याज्ञिक यांच्या दुर्मिळ आजाराची चर्चा...

काहीतरी चुकीचं..., अलका याज्ञिक यांच्या दुर्मीळ आजारावर सेलिब्रीटींची प्रतिक्रिया
अलका याज्ञिक
| Updated on: Jun 18, 2024 | 2:29 PM

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गोड आवाजाने रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अलका याज्ञिक यांना एक दुर्मिळ न्यूरो डिसऑर्डर (आजार) झाला आहे. न्यूरो डिसऑर्डर हा एक दुर्मिळ आजार आहे. ज्यामुळे काहीही ऐकायला येत नाही. अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आजाराची माहिती दिली. त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांना देखील चिंता वाटू लागली आहे.

अलका याज्ञिक यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी . अलका याज्ञिक यांच्यासाठी प्रार्थना देखील केली. फक्त चाहत्यांनीच नाहीतर, सेलिब्रिटींनी देखील अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

 

 

अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकृतीची अपडेट चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. अलका याज्ञिक यांच्या पोस्टवर कमेंट करत गायक सोनू निगम म्हणाला, ‘मला वाटलंच काहीतरी चुकीचं होत आहे. मी भारतात आल्यानंतर नक्की तुमची भेट घेईल. देव तुम्हाला लवकर ठिक करतील…’

अभिनेत्री इला अरुण यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. ‘ऐकून प्रचंड वाईट वाटलं. प्रचंड हृदयद्रावक आहे. उत्तम डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर तुमची प्रकृती ठिक होईल… लवकरच आम्हाला तुमचा गोड आवाज ऐकण्याची संधी मिळणार आहे…’ सध्या सर्वत्र पोस्टची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री पुनम ढिल्लों यांनी देखील अलका याज्ञिक यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली आहे. ‘तुम्हाला भरभरुन प्रेम आणि आशीर्वाद… तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुम्हा लवकरच ठिक व्हाल…’ सांगायचं झालं तर, सेलिब्रिटींशिवाय असंख्य चाहत्यांनी देखील अलका याज्ञिक यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.

सोशल मीडियावर अलका याज्ञिक यांनी पोस्ट केल्यांनंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली. अलका याज्ञिक बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. अलका याज्ञिक यांनी जवळपास 21 हजार पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली गाणी आजही चाहते तितक्याच आवडीने ऐकतात.