मलायका- अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा!

  • Sachin Patil
  • Published On - 16:42 PM, 31 Oct 2018

मुंबई गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगत आहेत. मात्र, आता मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या चर्चेला ब्रेक मिळाला आहे. सध्या तरी दोघे लग्न करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे एकमेकांना वर्षभरापासून डेट करत असल्याची चर्चा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुन आणि मलायका हे सध्यातरी लग्न करणार नाहीत. डीएनए  दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, मलायका आणि अर्जुनच्या जवळच्या मित्राने नाव न सांगण्याच्या अटीवर दोघे लग्न करणार नसल्याचा दावा केला आहे.

दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न मित्राला विचारला असता, लग्नाआधी अर्जुन आणि मलायकाला एकमेकांसोबत अधिक काळ घालवायचा असून, आपलं नातं घट्ट करायचं आहे. तसेच दोघांच्या व्यक्तीगत आयुष्यात लूडबूड करणं चुकीचं आहे असं तो म्हणाला.

अर्जुन आणि मलायका दोघांपैकी कोणीही लग्नाचा विचार करत नसून, यासाठी वाट पाहावी लागणार आहे. याउलट, अर्जुनला बहीण अंशूलाच्या लग्नाचं टेन्शन असल्याचंही मित्रानं सांगितलं. 

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी गेल्या वर्षी घटस्फोट घेतला होता. अरबाज आणि मलायक यांनी 17 वर्षांचा सुखी संसार थाटल्यानंतर  वेगळं होण्याचा निर्णय घेतला.