Lok Sabha Election 2024 : मतदान ओळखपत्र झालं गहाळ ? फिकर नॉट… तरीही तुम्ही करू शकता मतदान, कसं ?

जर तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण मतदार ओळखपत्र नसतानाही तुम्ही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकता. मतदार ओळखपत्राशिवाय लोकसभा निवडणुकीत मतदान कसे करायचे ते जाणून घेऊया.

Lok Sabha Election 2024 : मतदान ओळखपत्र झालं गहाळ ? फिकर नॉट... तरीही तुम्ही करू शकता मतदान, कसं ?
व्होटर आयडी नसेल तर मतदान कसं करायचं ?
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 8:37 AM

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज (26 एप्रिल) सुरूवात झाली. देशभरातील 13 राज्य आणि 88 क्षेत्रात आज लोक मत नोंदवणार आहेत. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदानाची ही प्रोसेस भारताच्या लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. पहिला टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी झाले तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार असून 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

निवडणुकीत मतदान करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीकडे मतदार ओळखपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र (EPIC) असणे आवश्यक आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI)नुसार, तुमचे मतदार ओळखपत्र हरवले असले तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता.

व्होटर आयडी नाही, तरी करू शकता मतदान

जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसले तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. यासाठी फक्तएक महत्वाची गोष्ट गरजेची आहे ती म्हणदे, अधिकृत मतदार यादीत तुमचे नाव असले पाहिजे आणि तुम्हाला निवडणूक स्लिपची प्रिंटआउट घ्यावी लागेल. तुमचे मतदार ओळखपत्र हरवले असेल तर तु्म्ही खाली नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र मतदान केंद्रावर आणू शकता:

1. पासपोर्ट

2. आधार कार्ड

3. पॅन कार्ड

4. ड्रायव्हिंग लायसन्स

5. मनरेगा कार्ड

6. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं आयडी कार्ड

7. फोटो असलेले पेन्शन कार्ड

जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी करू शकता. ऑनलाइन नोंदणीसाठी, ECI वेबसाइटवर ‘फॉर्म 6′(https://old.eci.gov.in/files/file/4843-form-6-application-form-for-new-voters/) भरावा. त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल आणि काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर फॉर्म सबमिट करावा आणि संदर्भ क्रमांक वापरून त्याची स्थिती तपासावी लागते. ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी, निवडणूक नोंदणी कार्यालय किंवा बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून फॉर्म 6 मिळवा. तसेच तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, युटिलिटी बिल, रेशन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे तयार ठेवा.

ऑनलाइन नोंदणी करण्यापूर्वी ही कागदपत्रे आवश्यक आहेत

1. ज्या वर्षी मतदार यादी अद्ययावत केली जाते त्या वर्षी 1 जानेवारी रोजी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

2. तुमच्याकडे एक पासपोर्ट साइज फोटो असला पाहिजे.

3. तुम्ही जन्म प्रमाणपत्राद्वारे (birth certifivcate) तुमचे वय सिद्ध करू शकता.

4. तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, एपीएल/बीपीएल कार्ड किंवा संबंधित संस्थांचे पत्र यासारखे (तुमच्या) पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.