AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Points Table: राजस्थाननंतर आता कोलकात्याचं प्लेऑफचं ठरलं, लखनौचं गणित बिघडलं

आयपीएल 2024 स्पर्धेत रविवारी पार पडलेल्या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. कोलकात्याने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत 16 गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे. तर लखनौला पराभवामुळे फटका बसला आहे. आता पुढच्या काही दिवसात राजस्थान आणि कोलकाता वगळता इतर संघांमध्ये दोन स्थानासाठी चुरस असेल.

IPL 2024 Points Table: राजस्थाननंतर आता कोलकात्याचं प्लेऑफचं ठरलं, लखनौचं गणित बिघडलं
| Updated on: May 05, 2024 | 11:23 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत रविवारी दोन सामने पार पडले.  या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर आयपीएल गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडले. या दोन्ही सामन्यातील निकाल शेवटच्या टप्प्यात खूपच महत्त्वाचे ठरले आहे. चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला 28 धावांनी पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांना मात देत तिसरं स्थान गाठलं आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. कोलकात्याने लखनौला 98 धावांनी पराभूत केलं. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे प्रत्येकी 16 गुण झाले आहेत. आयपीएलच्या गणितात 16 गुण क्वॉलिफाय होण्यात पुरेसे असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काही गणित सोडता या दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये एन्ट्री मारल्यात जमा आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेला पहिल्यांदा फलंदाजी आली. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 9 गडी गमवून 167 धावा केल्या. तर पंजाबचा संघ 139 धावा करू शकला. 28 धावांनी विजय झाल्याने चेन्नईच्या नेट रनरेटमध्ये जबर फायदा झाला आहे. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 6 गडी गमवून 235 धावा केल्या. तसेच विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं. तर लखनौ सुपर जायंट्सला फक्त  137 धावा करता आल्या. या विजयामुळे लखनौचं मात्र नुकसान झालं आहे. तर कोलकात्याने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स 16 आणि +1.453 नेट रनरेटसह पहिल्या , राजस्थान रॉयल्स 16 गुण आणि +0.622 नेट रनरेटसह दुसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स 12 गुण आणि +0.700 नेट रनरेटसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 12 आणि +0.072 नेट रनरेटसह चौथ्या, लखनौ सुपर जायंट्स 12 गुण आणि -0.371 नेट रनरेटसह पाचव्या, दिल्ली कॅपिटल्स 10 गुण आणि -0.442 नेट रनरेटसह सहाव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु 8 गुण आणि -0.049 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्स 8 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.320 नेट रनरेटसह नवव्या आणि मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.356 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र