
Allu Kanakaratnam Death: साऊथ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या आजीचं निधन झालं आहे. वयाच्या 94 व्या वर्षी अभिनेत्याच्या आजीने अखेरचा श्वात घेतला आहे. अल्लू अर्जुन याच्या आजीचं नाव अल्लू कनकरत्नम असं होतं. शुक्रवारी म्हणजे 29 ऑगस्त सकाळी 1.45 मिनिटांनी अभिनेत्याच्या आईचं निधन झालं आहे. आजीच्या निधनाची माहिती कळताच राम चरण याने देखील सिनेमाचं चित्रीकरण सोडून अंतिम संस्कारांना उपस्थित राहण्यासाठी दाखल झाला.
अल्लू अर्जुनच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या आजीचं पार्थिव लवकरच अरविंद निवास येथे आणले जाईल. शनिवारी, 30 ऑगस्ट रोजी दुपारी कोकापेट येथे अंतिम संस्कार केले जातील. आजीच्या निधनाने अभिनेत्याला देखील मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन देखील दिग्दर्शक अॅटली यांच्यासोबत एका प्रोजेक्टसाठी मुंबईत होता. पण, आजीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर, अभिनेता हैदराबादला परतला, तसेच, राम चरण याने पेड्डी सिनेमाचं शूटिंग अर्ध्यावरच सोडलं आहे.
म्हैसूरमध्ये पेड्डीच्या गाण्याचं शूटिंग करणाऱ्या राम चरण याने देखील घरी परतण्यासाठी त्यांचं सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पवन कल्याणची पत्नी अण्णा लेझनेवा आधीच अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचली आहे, तर पवन कल्याणच्या आगमनाची अद्याप पुष्टी झालेली नाही. तर निर्माते नागा वंशी, दिग्दर्शक त्रिविक्रम आणि इतर अनेक सेलिब्रिटी देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहेत. अनेक मोठ्या व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.