Amitabh Bachchan : बिग बींनाही करवा लागलाय आर्थिक संकटाचा सामना, तेव्हा जया बच्चन यांच्या खांद्यावर होती कुटुंबाची जबाबदारी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

जया बच्चन यांना आपण नेहमी त्यांच्या तापट स्वभावामुळे ओळखतो. पण त्या तितक्याच प्रेमळ देखील आहेत. बच्चन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. तेव्हा त्या ढाल बनून अमिताभ बच्चन यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या पण या गोष्टीची प्रसिद्धी त्यांनी केव्हाच केली नाही. एका मुलाखतीत ही माहिती समोर आली आहे.

Amitabh Bachchan  : बिग बींनाही करवा लागलाय आर्थिक संकटाचा सामना, तेव्हा जया बच्चन यांच्या खांद्यावर होती कुटुंबाची जबाबदारी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
AMITABH BACCHAN AND JAYA BACCHAN
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 04, 2026 | 2:13 PM

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकि‍र्दीत एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले. आज त्याचं नाव बॉलिवूड सिनेसृष्टीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. वयाच्या 80 वयातही ते कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र एक काळ असा होता जेव्हा अमितभ बच्चन यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.त्यांची कंपनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड आर्थिक संकटात सापडली होती. या कठीण काळात जया बच्चन यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती.

भावना बलसावर या 1990 च्या दशकातील लोकप्रिय मालिका ‘देख भाई देख’ या मधील सुनीता दिवान या भूमिकेमुळे ओळखल्या जातात. त्यांनी सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल ( ABCL ) कंपनीच्या घाट्या विषयी आणि कठिण काळाविषयी स्पष्टपणे सांगितले.

Loading...

त्या म्हणाल्या कि ‘देख भाई देख’ या मालिकेशी अमिताभ बच्चनच्या ABCL आणि सरस्वती ऑडिओ व्हिज्यु्अल्स या कंपनीचा संबंध होता. या मालिकेची निर्मिती जया बच्चन यांच्या ‘सरस्वती ऑडिओ व्हिज्युअल्स’ या बॅनरखाली झाली होती, जे पुढे जाऊन ‘ABCL’ (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड) मध्ये विलीन करण्यात आले. त्यामुळे या मालिकेच्या निर्मितीचे श्रेय ABCL चे होते. जया बच्चन या त्या मालिकेच्या निर्मात्या होत्या.

भावन यांनी सांगितलं की त्यावेळी बच्चन कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याच्या चर्चा कलाकारांपर्यंत पोहोचत होत्या.कंपनीची परिस्थिती पार बिकट होती. मात्र जया बच्चन यांनी परिस्थितीची झळ मालिकेतील कलाकारांना किंवा तांत्रिक टिमलाही बसू दिली नाही. त्या सेटवर आल्यावर सर्वांशी हसून खेळून वागायच्या. त्यांच्या वागण्यातूनही त्यांनी कोणतीही अडचण जाणवू दिली नाही.

मालिकेच्या सेटबद्ल बोलताना भावना यांनी त्यांच्या सेटबद्दलही कौतुक केलं होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेट एखाद्या मोठ्या घरासारखा होता.त्यामध्ये दोन मजले, जिने, अनेख खोल्या आणि मल्टी – कॅमेरा सेट अप होता. त्या काळात एवढा मोठा आणि कायमस्वरुपी सेट उभारणं ही मोठी गोष्ट होती. आर्थिक अडचणीत असून सुद्धा जया बच्चन यांनी मालिकेशी कोणतीही तडजोड केली नाही.

भावना यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की मालिकेतून मिळणारा पैसा इतर कर्जांची परतफेड करण्यासाठी निर्मात्यांनी केव्हाच केला नाही. असा भावना यांचा दावा आहे. मालिकेच्या निर्मितीतून मिळणारी रक्कम पुन्हा त्याच मालिकेवर खर्च केली जात होती. कारण शो हीट होता. म्हणून पैसे येत गेले. त्या काळात TRP च्या आधारावर इसेंटिव्ह्स सुद्धा मिळायचे. परिस्थिती जी काही असुदेत त्यांनी शोवर आपल्या परिस्थितीचा केव्हाच परिणाम होऊ दिला नाही. 1993 मध्ये दूरदर्शनच्या डीडी मेट्रोवर ‘ देख भाई देख’ ही मालिका सुरू झाली होती. आजही 90 च्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिचं नाव घेतलं जाते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us