
Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. बिग बी कायम एक्स आणि ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या प्रत्येक ट्विटवर चाहते देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत असतात. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक शब्द जरी लिहिला तरी त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असतात. पण जर कोणी बिग बी यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर बिग बी त्यांना देखील सोडत नाही. आता देखील असंच काही झालं आहे. ट्रोल करणाऱ्याला अमिताभ बच्चन यांनी सडेतोड उत्तर दिलं. पण त्यांनी लगेच ट्विट डिलिट देखील केलं.
एका नेटकऱ्याने एक्सवर अभिताभ बच्चन यांच्यासाठी लिहिलं होतं, ‘रात्री शहंशाह जागे का आहेत? झोपा आता तुमचं वय झालं आहे…’ यावर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘एक दिवस तुझं देखील वय होणार आहे… देवाची इच्छा…’ पण नंतर लगेच त्यांनी ट्विट डिलिट केलं.
अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं होतं. ‘गॅजेट्स तुटतात… पण वय कायम राहतं…’ यावर एक नेटकरी म्हणाला, ‘वेळेत झोपत जा… नाही तर वय देखील जास्त काळ टिकणार नाही.’ अमिताभ बच्चन यांना हे आवडलं नाही आणि त्यांनी नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं.
बिग बी म्हणाले, ‘माझ्या मरणांची चर्चा करण्यासाठी धन्यवाद… देवाची इच्छा…’ हे ट्विट देखील अमिताभ बच्चन यांनी डिलिट केलं. सध्या अमिताभ बच्चन यांच्या ट्विटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहींनी बिग बी यांनी दिलेल्या उत्तराचं कौतुक केलं आहे, तर अनेकांनी टीका केली आहे.
सांगायचं झालं तर, बिग बी कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. नव्या सिनेमाचं अपडेट किंवा मनातील भावना मांडण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. फक्त सोशल मीडियावर नाही तर, जगभरात अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आजही चाहते अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात.
अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन चाहत्यांचं सिनेमांच्या माध्यमातून मनोरंजन करत आहेत. अमिताभ बच्चन फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात.