नकली पनीर वादानंतर कशी झालीये शाहरुख खानच्या रेस्टॉरंटची अवस्था, शेफकडून मोठा खुलासा
Gauri Khan's Restaurant Torii: नकली पनीर वादानंतर कसा सुरु आहे गौरी खानच्या टोरी रेस्टॉरंटचा व्यवसाय..., कशी झालीये रेस्टॉरंटची अवस्था? शेफने केलाय मोठा खुलासा, सर्वत्र रंगल्या आहेत चर्चा...

Gauri Khan’s Restaurant Torii: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याची पत्नी इंटेरिअर डिझायनर गौरी खानचं रेस्टॉरंट ‘टोरी’ (Torii) वादाच्या भोवऱ्यात अडकला, जेव्हा एका कंटेंट क्रिएटरने दावा केला की, टोरी रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांना नकली पनीर दिलं जातं. आयोडीट टेस्टच्या आधारावर कंटेंट क्रिएटरने असा धक्कादायक दावा केला होता. पण रेस्टॉरंटच्या शेफने सर्व आरोप फेटाळत प्रकरणावर स्पष्टीकरण देखील दिलं होतं. दरम्यान, या वादाचा रेस्टॉरंटवर झालेल्या परिणामाबद्दल मुख्य शेफ स्टेफन गॅडिट यांनी उघडपणे सांगितलं आहे.
स्टेफन म्हणाले, ‘जेव्हा आपण आपल्यानुसार कोणत्या गोष्टीवर बोट ठेवतो तेव्हा त्याचा परिणाम नक्की पडत असतो. आम्ही आमच्या ग्राहकांना चांगलेच पदार्थ देत असतो. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचं कोणतं कारण नाही. आम्ही प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं कारण लोकांना देखील कळलं पाहिजे की काय आणि कसं होतं आहे.’
पुढे स्टेफन म्हणाले, ‘खाद्य रसायनशास्त्र आणि खाद्य विज्ञानात खूप काही गोष्टी सुरु आहेत, त्यासाठी चार वर्षे लागतात, एखाद्या गोष्टीवर काहीतरी टाकणं म्हणजे फक्त… मला चुकीचं समजू नका. त्यांनी ते त्यांच्या हेतूनं केलं. त्यांना फक्त चाचणी करायची होती.’
View this post on Instagram
पनीर बनावट असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ डिलीट केला
मुलाखतीत स्टेफन यांना नकली पनीरचा दावा करणाऱ्या कंटेंट क्रिएटरबद्दल देखील विचारण्यात आलं. ‘आम्ही त्या गृहस्थाशी बोललो आणि पाककृती जगात गोष्टी कशा केल्या जातात आणि अन्न विज्ञान कसे कार्य करते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना देखील आमचं म्हणणं पटलं आणि त्यांनी व्हिडीओ डिलिट केला. शिवाय नक्की काय सुरु आहे हे समजून घेण्यास लोकं देखील समर्थशाली आहेत.’
‘नकली पनीर प्रकरणानंतर आमच्या व्यवसायात देखील वाढ झाली आहे. इन्स्टाग्रावर देखील चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मी म्हणेल की वादग्रस्त प्रकरण आमच्यासाठी वरदान ठरलं आहे…’ एवढंच नाही तर, नकली पनीरचा दावा करणाऱ्या कंटेंट क्रिएटरच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. कंटेंट क्रिएटरने मुंबईतील महागड्या हॉटेलमध्ये जाऊन पनीरचं परीक्षण केलं होतं. ज्यामध्ये गौरी खानच्या रेस्टॉरंट ‘टोरी’मध्ये नकली पनीर मिळत असल्याचा दावा त्याने केला होता.
