विजय माल्याची सून असती दीपिका पादुकोण! त्या विचित्र घटनेनंतर सर्वकाही संपलं
Vijay Mallya: 'त्याने विचित्र वर्तन केलं...', विजय माल्याच्या मुलाने दीपिका सोबत असं काय केलं, ज्यामुळे मोडलं नातं, नाहीतर आज दीपिका पादुकोण असती माल्या कुटुंबाची सून, फार कमी लोकांना माहिती आहे सत्य घटना

Vijay Mallya: अभिनेत्री दीपिका पादुकोण आज तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा देखील होता जेव्हा दीपिका तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. काही वर्षांपूर्वी दीपिका हिच्या नावाच्या चर्चा उद्योजक विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्या याच्यासोबत रंगल्या होत्या. सिद्धार्थ आणि दीपिका एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण अचानक दीपिका आणि सिद्धार्थ यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांविरोधात वक्तव्य देखील केलं होतं.
सिद्धार्थ याची वागणूक योग्य नव्हती असं दीपिका हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. दीपिकाने नातं टिकवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण सिद्धार्थ याची वागणूक विचित्र होती… असं खुद्द अभिनेत्रीने सांगितलं. सिद्धार्थ आणि दीपिका यांची शेवटची भेट लाजिरवाणी होती… सिद्धार्थ याने दीपिकाला हॉटेलचं बिल भरायला लावलं होतं.
मुलाखतीत दीपिका म्हणाली, ‘आम्ही जेव्हा डिनर डेटसाठी भेटलो होतो, तेव्हा त्याने मला बिल भरायला लावलं होतं. ही गोष्ट माझ्यासाठी प्रचंड लाजिरवाणी होती. या नात्याला संपवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. कारण त्या नात्यामध्ये बाकी काही उरलंच नव्हतं…’
पुढे दीपिका म्हणाली, ‘सिद्धार्थने एकदा मला रिक्षाने प्रवास करण्यास सांगितलं होतं. ही अत्यंत खालच्या पातळीची वागणूक होती. जेव्हा मी त्याच्याकडून ड्रेस मागितला तेव्हा त्याने स्वस्त सेलमधून माझ्यासाठी ड्रेस घेतला आणि मोल – भाव करु लागला…’
‘मी एक टीशर्ट खरेदी केला आणि त्यानंतर ताज हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तेव्हा त्याने मला बिल भरायवा लावलं आणि ती भेट आमची शेवटची भेट होती…’ असं देखील दीपिका म्हणाली.
फक्त दीपिकानेच नाही तर, सिद्धार्थ याने देखील दीपिकाच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. ‘पागल बाई आहे… मी तिचे सर्व पैसे परत करेल…’ असं देखील सिद्धार्थ म्हणाला होता. पण तेव्हा दीपिका आणि सिद्धार्थ यांचे एकत्र अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. सर्वत्र दीपिका आणि सिद्धार्थ यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती.
सांगायचं झालं तर, दीपिका पादुकोण 2006 मध्ये किंगफिशर कॅलेंडर लॉन्च एडिशनचा भाग होती. किंगफिशर कॅलेंडर विजय माल्या याच्या मालकीचा होता. किंगफिशर कॅलेंडर अनेक सेलिब्रिटींच्या करीयरला एक वेगळी आणि उत्तम दिशा मिळाली. दीपिका कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
