AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडची उपांत्य फेरीची सोपी संधी हुकली, कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची उपांत्य फेरीची सोपी संधी न्यूझीलंडने गमावली. इंग्लंडविरुद्धचा सामना गमवल्याने आता पाकिस्तान श्रीलंका सामन्याकडे लक्ष असणार आहे. या सामन्यातील निकाल आता न्यूझीलंडचं भवितव्य ठरवणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडची उपांत्य फेरीची सोपी संधी हुकली, कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला...
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडची उपांत्य फेरीची सोपी संधी हुकली, कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला...Image Credit source: Getty Images
| Updated on: Feb 27, 2026 | 11:06 PM
Share

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धचा सामना गमवाला आणि उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आलं. खरं तर हा सामना न्यूझीलंडने जिंकला असता तर गट 2 मधील उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरला असता. पण तसं झालं नाही. न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत आहेत. आता पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजयासह नेट रनरेटचं गणित सोडवावं लागणार आहे. न्यूझीलंडपेक्षा नेट रनरेट चांगला करायचा असेल तर सामना 65 धावांनी किंवा दिलेलं टार्गेट 13.2 षटकात पूर्ण करणं भाग आहे. तरच न्यूझीलंडपेक्षा नेट रनरेट चांगला राहिल आणि उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. अन्यथा न्यूझीलंडला संधी मिळेल. असं असताना या पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. नेमकं काय चुकलं याचं विश्लेषण केलं.

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, एक चांगला सामना होता. जर आम्ही जिंकलो तर आमचं उपांत्य फेरीचं गणित सोपे झाले असते. तुम्हाला माहिती आहे, आम्ही खूप चांगला खेळ खेळलो. काही क्षण आहेत, ज्याकडे मागे वळून पाहू शकता आणि खेळाच्या पराभवाचे थोडेसे वळण घेऊ शकता. पण इंग्लंड आणि त्यांनी ज्या पद्धतीने खेळले त्याचे श्रेय. आम्ही शेवटच्या काही षटकांना लक्ष्य करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केला आणि तिथे काही गमावले. आम्ही फक्त 160 पर्यंत धावा केल्या. सहजपणे 170 ते 175 असू शकले असते.

न्यूझीलंडचा कर्णधार रेहानबाबत म्हणाला की, ‘हो, नक्कीच. म्हणजे, तुम्हाला माहिती आहे, रेहानने गेल्या काही वर्षांत बॅटने त्याचा दर्जा दाखवला आणि अर्थातच तो फिरकीविरूद्ध चांगला खेळाडू होता. तुम्हाला माहिती आहे, तो त्या विकेटवर खरोखर घाबरला नव्हता. मला वाटतं की जॅक्सीसोबतची त्याची भागीदारी, पण बॅंटन आणि करननेही पुरेशी सेट केली.’ आता न्यूझीलंडचं उपांत्य फेरीचं गणित पूर्णपणे पाकिस्तानच्या हातात आहे. श्रीलंकेने हा सामना जिंकला तर न्यूझीलंड उपांत्य फेरीत असेल. पण श्रीलंकेचा पराभव झाला तर मात्र गणित नेट रनरेटवर ठरेल.

Follow Us
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा