AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या दिवशी वाटलं मी निर्वस्त्र…, प्रसिद्ध अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य

Bollywood Actress Life: डिझायनरने असं काय केलं ज्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, 'त्या दिवशी वाटलं मी निर्वस्त्र...', अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

त्या दिवशी वाटलं मी निर्वस्त्र..., प्रसिद्ध अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य
| Updated on: Jun 09, 2025 | 2:40 PM
Share

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रींना अनेकदा चढ – उतारांचा सामना करावा लागतो. पूर्वी करीयर नष्ट होईल या भीतीने अभिनेत्री शांत राहायच्या. पण काळ पूर्णपणे बदलाल आहे. अभिनेत्री पुढे येत त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट घटना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मौसमी चॅटर्जी आहे.

मौसमी चॅटर्जी यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं पण त्यांनी कधीच मोठ्या पडद्यावर स्विमसूट आणि तोकडे कपडे घातले नाहीत. मोठ्या पडद्यावर तोकडे कपडे घालणं मौसमी चॅटर्जी यांना देखील कधी पटलं नाही. यावर मौसमी चॅटर्जी यांनी अनेकदा स्वतःचं मत देखील मांडलं आहे.

तोकडे कपडे आवडत नसल्यामुळे मौसमी चॅटर्जी यांनी कायम साडी आणि पारंपरिक ड्रेसमध्ये शूट केलं. एवढंच नाही तर, त्यांनी कधी डीप नेक ब्लाउज देखील घालण्यास होकार दिला नाही. ‘गुड्डी’ सिनेमातून मौसमी चॅटर्जी यांना एकाच कारणामुळे काढण्यात आलं कारण त्यांनी सिनेमात स्कर्ट घालण्यास नकार दिला.

मौसमी चॅटर्जी यांच्या वक्तव्यानुसार, वयाच्या 13 व्या वर्षापासून मौसमी चॅटर्जी यांनी साडी नेसण्यास सुरुवात केली. मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, ‘एकदा कॉस्ट्यूम डिझायनर मणि जे रबाडी यांनी मला सिनेमासाठी बॅकलेस ब्लाऊज आणि छोटा घागरा दिला होता.’

बॅकलेस ब्लाऊज आणि छोटा घागरा पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा मला असं वाटलं की मी निर्वस्त्र झाली आहे…’ असं खुद्द मौसमी चॅटर्जी म्हणाल्या होत्या. आजही मौसमी चॅटर्जी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

सांगायचं झालं तर, 2019 मध्ये मौसमी चॅटर्जी एका महिला अँकरवर भडकल्या होत्या. महिला अँकर पँट घातल्यामुळे मौसमी चॅटर्जी यांनी संताप व्यक्त केलेला. ‘तुम्ही असे कपडे घालून आलात, जे चांगले दिसत नाहीत…. तुम्हाला चुडीदार, कुर्ता किंवा साडी नेसायला हवी होती…’ असं मौसमी चॅटर्जी महिला अँकरला म्हणाल्या होत्या. मौसमी चॅटर्जी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...