AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिल्पा शेट्टीचं धक्कादायक वक्तव्य, त्याने माझा वापर केला आणि सोडून दिलं

Shilpa Shetty Love Life: त्याने माझा वापर केला आणि सोडून दिलं...., जेव्हा शिल्पा शेट्टीने सर्वांसमोर सांगितलं खासगी आयुष्यातील मोठं सत्य, शिल्पा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

शिल्पा शेट्टीचं धक्कादायक वक्तव्य, त्याने माझा वापर केला आणि सोडून दिलं
फाईल फोटो
| Updated on: Jun 09, 2025 | 1:18 PM
Share

Shilpa Shetty Love Life: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आतापर्यंत शिल्पाने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना शिल्पा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिली. आज शिल्पा उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण राज कुंद्रा याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी शिल्पा हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत झाली.

शिल्पा शेट्टी हिने अभिनेता अक्षय कुमार याला देखील अनेक वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. शिल्पाने एका मुलाखतीत अक्षयवर गंभीर आरोप देखील केले होते. अक्षय कुमार याने देखील अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्यासोबत देखील अक्षयच्या नावाची चर्चा रंगली.

शिल्पा आणि अक्षय यांच्या जोडीला चाहत्यांनी खऱ्या आयुष्यात देखील डोक्यावर घेतलं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासाठी अक्षयने शिल्पाला सोडलं… अशा चर्चांनी देखील जोर धरला होता. अक्षयने माझा वापर केला आणि मला सोडून दिलं… यांसारखे गंभीर आरोप शिल्पाने अभिनेत्यावर केले.

शिल्पा म्हणाली, ‘अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फसवणूक केली आहे. आधी गर्लफ्रेंडला विश्वासात घेण्यसाठी लगेच साखरपुडा करायचा आणि मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा. एवढंच नाही तर, याठिकाणीच लग्न करु असं वचन देखील द्यायचा. पण नव्या मुलीची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर अक्षय सर्व वचन विसरुन जायचा..’

फक्त शिल्पा हिनेच नाही तर, अभिनेत्री रवीना टंडन हिने देखील अक्षय कुमार याच्यावर फसवणुकीचे आरोप केले. रवीना आणि अक्षय यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दरम्यान त्यांच्या नात्याची चर्चा देखील सर्वत्र पसरली होती. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.

अक्षय कुमार याचं लग्न

अक्षय कुमारने 17 जानेवारी 2001 रोजी ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं. हे कपल आज बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध कपल मानलं जातं. या जोडप्याला दोन मुले देखील आहेत आणि आज ते खूप आनंदी जीवन जगत आहेत. तर शिल्पा आणि रवीना देखील त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. रवीनाची लेक राशा थडानी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं आहे. राशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी