AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगोडा बोलो, लेकिन चोर नही…, विजय माल्याने का मागितली माफी? भारतापुढे ठेवली मोठी अट

Vijay Mallya: भगोडा बोलो, लेकिन चोर नही..., इतके वर्ष का समोर आला नाही विजय माल्या, आता भारतापुढे मोठी अट ठेवत का मागितली माफी? एका मुलाखतीमुळे विजय माल्या पुन्हा आलाय चर्चेत...

भगोडा बोलो, लेकिन चोर नही..., विजय माल्याने  का मागितली माफी? भारतापुढे ठेवली मोठी अट
फाईल फोटो
| Updated on: Jun 09, 2025 | 1:25 PM
Share

Vijay Mallya: फरार उद्योजक विजय माल्या याने किंगफिशर एअरलाईन्स बंद झाल्यामुळे माफी मागतली आहे. शिवाय चोरीच्या आरोपांना देखील विजय माल्याने फेटाळलं आहे. एवढंच नाही तर, विजय माल्या भारत सोडून यूके याठिकाणी का स्थायिक झाला? असे अनेक खुलासे विजय माल्या याने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत केले आहे. 2008 च्या आर्थिक मंदीचा उल्लेख करताना मल्ल्या म्हणाला, त्याचा परिणाम त्याच्या कंपनीवर तसेच संपूर्ण देशावर झाला.

मला फरार बोला पण चोर नको – विजय माल्या

राज शमानी याच्या पॉडकास्टमध्ये विजय माल्या म्हणाला, ‘किंगफिशर एअरलाईन्सच्या अपयशामुळे मी सर्वांची माफी मागतो.’ यावेळी विजय याने माफी तर मागितली पण त्याने भारतापुढे एक मोठी अट देखील ठेवली आहे. ‘जर मला भारतात निष्पक्ष खटला आणि सन्माननीय जीवन मिळण्याची खात्री मिळाली तर मी भारतात परतण्याचा गंभीरपणे विचार करेन. तुम्ही मला फरार म्हणू शकता पण चोर नाही. चोरचा अर्थ काय असतो तुम्हाला माहिती आहे का? मी पळालेलो नाही. मी भारतातून पूर्वनियोजित यात्रेवर आलो आहे.’ असं देखील माल्या म्हणाला.

विजय माल्यावर काय आहेत आरोप?

विजय मल्ल्यावर भारतीय बँकांनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले 9 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. भारत सरकार विजय मल्ल्याला कायदेशीररित्या भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. 2018 मध्ये युकेच्या एका न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाचा निर्णय दिला. अन्याय्य वागणूक आणि मीडिया ट्रायलचा हवाला देत तो भारतात परतण्यास विरोध करत आहे.

सीबीआय आणि ईडीच्या आरोपांवर विजय माल्याचं उत्तर

पॉडकास्टमध्ये विजय मल्ल्याने सीबीआय आणि ईडीच्या आरोपांनाही उत्तर दिलं. सीबीआयने माझ्यावर ब्रँड व्हॅल्युएशन आणि खाजगी जेटचा गैरवापर केल्याचा आरोप केला. ईडीने 3547 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे, परंतु एअरलाइनच्या 50% खर्च परकीय चलनात होते. त्याला मनी लाँड्रिंग म्हणणे मूर्खपणाचे आहे.” मल्ल्याच्या मते, त्याने आयडीबीआय बँकेचे 900 कोटी रुपयांचे कर्ज देखील परत केलं आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.