राज ठाकरेंबरोबरच्या त्या व्हिडीओवर सोनालीने सोडलं मौन, बेंद्रे आणि ठाकरे कुटुंबियांचं कसं आहे कनेक्शन?
Sonali Bendre: शर्मीला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्यामध्ये कसं आहे कनेक्शन? राज ठाकरेंबरोबरच्या त्या व्हिडीओवर अभिनेत्रीचं लक्षवेधी वक्तव्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिच्या वक्तव्याची चर्चा...

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आज मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोनाली तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील सोनाली तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. तब्बल 30 वर्षांनंतर सोनाली आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसल्यामुळे दोघांच्या मैत्रीच्या चर्चांना उधाण आलं.
दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली हिने राज ठाकरेंबरोबरच्या त्या व्हिडीओवर मौन सोडलं आहे. रंगणाऱ्या सर्व चर्चा सोनाली बेंद्रे हिने फेटाळल्या आणि म्हणाली, ‘मला याबद्दल काहीही माहिती नाही. पण अशा चर्चा करणं योग्य नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली.
View this post on Instagram
पुढे सोनाली म्हणाली, ‘सर्वात आधीतर यामध्ये दोन कुटुंब आणि कुटुंबातील सदस्य सामिल असतात. दोन्ही कुटुंबियांमध्ये फार जुने संबंध आहेत. माझ्या बहिणीचे पती एक क्रिकेटर आहेत. ते राज यांच्या चुलत भावासोबत क्रिकेट खेळतात. दोघे कायम क्रिकेट खेळत असतात.’
‘दुसरी गोष्ट म्हणजे, माझ्या बहिणीची सासू रामनारायण रुइया कॅलेजमध्ये इंगलिश लिटरेचर डिपार्टमेंटच्या हेट आहेत. माझं शिक्षण देखील त्याच कॅलेजमध्ये झालं आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहोत.’
शर्मिला ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नात्यावर सोनाली बेंद्रे म्हणाली, ‘शर्मिला ठाकरे यांच्या आई आणि माझी मावशी सर्वात चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांच्या आईने 10 दिवस रुग्णालयात माझी काळजी घेतली होती. असं खास कनेक्शन आमच्यात आहे..’ असं देखील सोनाली बेंद्रे म्हणाली.
View this post on Instagram
सोनाली बेंद्रे हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहेत. त्यानंतर अभिनेत्रीने ‘ब्रोकन न्यूज’च्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनाली बेंद्रे कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.