AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Mallya: विजय माल्यामुळे दीपिका पादुकोण, कतरिना कैफ यांना मिळालेलं यश, पण कसं?

Vijay Mallya: दीपिका पादुकोण, कतरिना कैफ यांना मिळालेलं यश आणि विजय माल्याचं काय आहे कनेक्शन? मोठं वक्तव्य करत म्हणाला, 'दीपिका, कतरिना एका रात्रीत स्टार झाल्या कारण...', सर्वत्र विजय माल्याच्या वक्तव्याची चर्चा...

Vijay Mallya: विजय माल्यामुळे दीपिका पादुकोण, कतरिना कैफ यांना मिळालेलं यश, पण कसं?
फाईल फोटो
| Updated on: Jun 10, 2025 | 8:05 AM
Share

Vijay Mallya on Katrina Kaif And Deepika Padukone: विजय मल्ल्याने बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. पण नुकताच झालेल्या मुलाखतीत विजय माल्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत. सांगायचं झालं तर, अनेक उद्योगांमध्ये विजय माल्या याने गुंतवणूक केली आहे. विजय माल्यासाठी किंगफिशर एयरलाइन्स सर्वात महत्त्वाचा उद्योग होता. पण आता किंगफिशर एयरलाइन्स बंद झाली आहे. 2000 च्या दशकात किंगफिशर एयरलाइन्सने बहुचर्चीत किंगफिशर कॅलेंडर देखील लॉन्च केला होता.

किंगफिशर कॅलेंडर तेव्हा सर्वत्र चर्चेत देखील होतं. किंगफिशर कॅलेंडरमध्ये 2003 मध्ये फोटोग्राफर अतुल कसबेकर यांच्यासोबत लाँच करण्यात आलेला एक बोल्ड वार्षिक स्विमसूट कॅलेंडर समाविष्ट होता. अशात नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये विजय माल्याने मोठा खुलासा केला. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांना एका रात्रीत स्टारडम कसं मिळालं यावर माल्यानं मोठं वक्तव्य केलं.

विजय माल्या म्हणाला, ‘दीपिका पादुकोण पासून कतरिना कैफ हिच्यापर्यंत अभिनेत्री एकारात्रीत स्टार झाल्या.’ किंगफिशर कॅलेंडरबद्दल विजय मल्ल्या म्हणाला, आम्ही योग्य मुली निवडल्या. मग त्या दीपिका पदुकोण असोत किंवा कतरिना कैफ…

‘आमच्या कॅलेंडरला फार वर्ष देखील झाली नव्हती. पण सर्व अभिनेत्री आणि सेलिब्रिटी आमच्या कॅलेंडरवर होते. आम्ही योग्य चेहऱ्यांची निवड केली. योग्य मुली आम्ही कॅलेंडरसाठी निवडल्या. एक उत्तम मार्केटिंग टूल म्हणून मी असं केलं. याचा मला व्यक्तीगत कोणताच फायदा झाला नाही. या ब्रांडमुळे मोठं चमत्कार झाला.’

पुढे विजय मल्या म्हणाला, ‘स्टारडमच्या दिशेने कॅलेंडरची वाटचाल होती…’ सांगायचं झालं तर, 2003 कतरिना कैफ किंगफिशर कॅलेंडर लॉन्च एडिशनचा भाग होती. तर दीपिका पादुकोण 2006 मध्ये किंगफिशर कैलेंडर लॉन्च एडिशनचा भाग होती.

किंगफिशर कैलेंडरच्या प्रसिद्धीपासून प्रेरित होऊन, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी 2025 मध्ये ‘कॅलेंडर गर्ल्स’ हा सिनेमा बनवला, ज्याची कथा फॅशन इंडस्ट्रीमध्ये मॉडेल्सनी स्वतःचे नाव कमावले याबद्दल होती. सिनेमातून मॉडेलींग विश्वातील काळं सत्य समोर आलं.

उद्योगपती विजय मल्ल्या याने नुकताच त्याच्या किंगफिशर कॅलेंडरबद्दल आणि 2000 च्या दशकात जेव्हा किंगफिशर बंद झालं नव्हतं तेव्हा त्याचा बॉलिवूड कल्चरवर परिणाम झाला याबद्दल सांगितलं. मुलाखतीत विजय मल्याने अनेक खुलासे केले.

दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघींना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दोघींनी आतापर्यंत अनेक सिनेमांंध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील दोघी कायम सक्रिय असतात.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.