16 व्या वर्षी लग्न, 17 व्या झाली आई, 25 व्या वर्षी नवऱ्याने साथ सोडताच अभिनेत्रीचं आयुष्य उद्ध्वस्त, कोण आहे ती?
Love Life: दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली साथ, वयाच्या 16 व्या वर्षी 31 वर्षीय सेलिब्रिटीसोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला पश्चाताप, आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतर आता काय करते अभिनेत्री, कोण आहे ती?

Actress Love Life: पूर्वी लग्न आणि मुल अभिनेत्रीच्या फिल्मी करीयरमध्ये धोक्याची घंटा ठरत होतं. त्यामुळे अभिनेत्री कधील लग्नाचा सर्वांसमोर स्वीकार करत नव्हत्या. पण आता काळ बदलला आहे. अभिनेत्री थाटामाटात लग्न करतात आणि जाहिरपणे प्रेग्नेंसीची घोषणा करतात. त्यानंतर पुन्हा कामाला देखील सुरुवात करतात. 90 च्या दशकातील एक अभिनेत्री आहे जिने वयाच्या 16 व्या वर्षी लग्न केलं आणि 17 व्या वर्षी पहिल्या मुलीला जन्म दिला. पण अभिनेत्रीचं लग्न फार काळ टिकलं नाही. वयाच्या 25 व्या वर्षी अभिनेत्रीने घटस्फोट न देता नवऱ्यापासून विभक्त झाली.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही डिंपल कपाडिया आहे. डिंपल कपाडिया फिल्मी कुटुंबातील आहेत. अभिनेत्रीने ‘बॉबी’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. वयाच्या 15 व्या वर्षी डिंपल प्रसिद्धी झोतात. त्यानंतर अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं.
बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना डिंपल आणि दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची ओळख झाली. कालांतराने ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 16 व्या वर्षी डिंपल कपाडिया हिने 31 वर्षीय राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
लग्नानंतर डिंपल यांनी संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. लग्नानंतर डिंपल यांनी दोन मुलींना जन्म दिला. पण असं म्हटलं जातं की, यानंतर दोघांमधील नात्यात दुरावा येऊ लागला. काही लोक म्हणाले की, दोघांमधील वयाचा फरक त्यांना सुसंगत बनवण्यासाठी पुरेसा नव्हता. काही लोक म्हणतात की त्यांना मुलगा हवा होता आणि जेव्हा दुसऱ्यांदा मुलगी झाली तेव्हा दोघांमधील वाद टोकाला पोहोचले.
अशात घटस्फोट न घेता डिंपल कपाडिया यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याने नवं वळण घेतलं. डिंपल यांनी मुलींची जबाबदारी घेतली आणि पतीपासून वेगळ्या झाल्या. काही दिवसांनंतर राजेश खन्ना यांना कर्करोगाचं निदान झालं. असं असताना डिंपल पतीकडे पुन्हा गेल्या आणि शेवटचे काही दिवस दोघे एकत्र राहिले.
पण, डिंपल कपाडिया यांनी तिच्या कारकिर्दीचा दुसरा अध्याय सुरू केला. यानंतर तिने चित्रपटसृष्टीत उंची गाठली आणि आज वयाच्या 67 व्या वर्षी डिंपल ग्लॅमरस आणि क्लासी दिसतात. अनेक सिनेमांमध्ये डिंपल यांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे.
