AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षण कधीपर्यंत असणार? RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान, म्हणाले…

Mohan Bhagwat : मोहन भागवत यांनी आज मुंबईत जेन झी आणि जेन अल्फा वयोगटातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणावर भाष्य केले आहे.

आरक्षण कधीपर्यंत असणार? RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान, म्हणाले...
Mohan Bhagwat on ReservationImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 06, 2026 | 9:50 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज मुंबईत जेन झी आणि जेन अल्फा वयोगटातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. यातील एक प्रश्न हा आरक्षणाबाबत होता. या प्रश्नावर मोहन भागवत यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. भागवत यांनी म्हटले की, ‘या प्रश्नाचे मी थेट उत्तर देणार नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करावे लागेल. पण समाजात जोपर्यंत सामाजिक भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहील. मात्र, यावर राजकारण होता कामा नये. कारण यामुळे समाजात भेद निर्माण होतो आणि परिणामी एकता वाढत नाही.’

आरक्षणाबाबत मोठं विधान

मुंबईतील या कार्यक्रमात भागवत यांना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की, शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण आजही लागू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ते इतक्या काळासाठी राहील असे कदाचित अपेक्षित केले नसेल. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही का? याला उत्तर देताना भागवत यांनी, ‘जोपर्यंत समाजात सामाजिक भेदभाव अस्तित्वात आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहील. मात्र, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्यांनी इतरांनाही संधी मिळावी याचा विचार करायला हवा. ज्या समाजघटकांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्यांच्या मनातही आम्हाला लाभ मिळाला, आता इतरांना संधी द्या असे मत व्यक्त होऊ लागले आहे’ असं विधान केले आहे.

Gen Z देशविरोधी नाही

मोहन भागवत यांनी जेन झी पिढीबाबत बोलताना म्हटले की, ‘जेन झी ने विरोध करू नये असे मी म्हणणार नाही, पण विरोध करण्याची एक योग्य पद्धत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात ती सांगितली आहे. जेन झी आपला आवाज उठवत आहे, कारण त्यांना ते आवश्यक वाटते. ते देशविरोधी नाहीत, ते देशविरोधी एजंट नाहीत. ते आपलेच लोक आहेत, आपली पुढची पिढी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे.’

शिक्षण व्यवस्थेत बदलांची गरज

शिक्षण व्यवस्था आणि आंदोलनांबाबत विचारलेल्या प्रश्नावर मोहन भागवत म्हणाले की, ‘आंदोलन हे देखील संवादाचाच एक प्रकार आहे. अन्यथा ती केवळ वादविवादाची बाब राहते. लोकांमध्ये संवाद झाला तर चांगले परिणाम मिळतात. लोकशाहीत आंदोलन हे व्यापक सहमती निर्माण करण्याचे एक माध्यम असते. जेव्हा लोकांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत, तेव्हा आंदोलन हा एक पर्याय बनतो. जेन झीच्या तक्रारी योग्य आहेत. भारताच्या शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्याची गरज आहे आणि त्यासाठी सातत्यपूर्ण संवाद आवश्यक आहे.’

Follow Us
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश