AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल मंत्री अन् नेत्यांनी खाल्ले काजू बदाम, आज कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त, धक्कादायक प्रकार

अकोल्यामध्ये आयोजित कृषिमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अधिकारी मोबाईलवर व्यस्त असल्याचं चित्र पहायला मिळालं. या बैठकीमध्ये एकीकडे दुष्काळावर चर्चा सुरू होती, मात्र दुसरीकडे अधिकारी हे सोशल मीडियावर व्यस्त होते.

काल मंत्री अन् नेत्यांनी खाल्ले काजू बदाम, आज कृषिमंत्र्यांच्या  दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त, धक्कादायक प्रकार
बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 3:51 PM
Share

महाराष्ट्रात पावसाने दडी मारली आहे, गेल्या ऑगस्ट महिन्यात आणि आता सप्टेंबर महिना संपत आला तरी देखील समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम हातचा गेला आहे, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असून, शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून देखील हालचालींना वेग आला आहे. रविवारी अकोल्यामध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या आढावा बैठकीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बैठकीला उपस्थित असलेले अधिकारी हे मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं.

अकोल्यामध्ये आयोजित कृषिमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अधिकारी मोबाईलवर व्यस्त असल्याचं चित्र पहायला मिळालं. या बैठकीमध्ये एकीकडे दुष्काळावर चर्चा सुरू होती, मात्र दुसरीकडे अधिकारी हे सोशल मीडियावर व्यस्त होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना दुष्काळाच्या परिस्थितीची गांभीर्य नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नांदेडमध्ये आयोजित दुष्काळाच्या आढावा बैठकीमध्ये नेते आणि मंत्री काजू बदाम खाताना दिसते, त्यामुळे टिका होत असतानाच आता दुसरीकडे अकोल्यामध्ये कृषिमंत्र्यांच्या उपस्थित आयोजित केलेल्या दुष्काळाच्या आढावा बैठकीमध्ये अधिकारी सोशल मीडियावर व्यस्त असल्याचं पहायला मिळत आहे.

यंदा विदर्भात देखील जेमतेमच पाऊस झाला आहे, त्यामुळे विदर्भात देखील दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे शेतकरी हातबल झाले आहेत. पिके सुकू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर आज अकोल्यामध्ये 8 जिल्हे आणि 56 तालुक्याची दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. मात्र ही बैठक सुरू असातना या बैठकीला उपस्थित असलेले अधिकारी मोबाईल पहाण्यात व्यस्त होते. कोणी व्हॉट्सअप पहात होतं. तर कोणी फेसबुक पहात होतं. यावरून अधिकारी शेतकऱ्यांबद्दल किती संवेदनशील आहेत, हे दिसून आलं. एकीकडे कृषिमंत्री म्हणतात, आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणतो आणि आम्ही निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहोत. मात्र दुसरीकडे अधिकारी मोबाईलवर व्यस्त असल्याचं पहायला मिळत आहे. यावरून आता संताप व्यक्त केला जात आहे.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...