अत्यंत कठीण वेळ, शब्दांत व्यक्त करू शकत नाही..; अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ही वेळ कठीण असून, मी शब्दांत दु:ख मांडू शकत नाही, असं त्यांनी लिहिलं आहे. बिग बींची ही पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.

अत्यंत कठीण वेळ, शब्दांत व्यक्त करू शकत नाही..; अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट
अमिताभ बच्चन
Image Credit source: Instagram
| Updated on: May 05, 2026 | 3:44 PM

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते चाहत्यांसाठी पोस्ट लिहित असतात. शिवाय बिग बींचा ब्लॉगसुद्धा चाहते आवर्जून वाचतात. या ब्लॉगमध्ये ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी, काही महत्त्वाच्या घटना, किस्से लिहितात. मंगळवारी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये एक भावूक पोस्ट लिहिली. या ब्लॉगमध्ये त्यांनी त्यांच्या एका चाहतीच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. अशा प्रकारचं दु:ख शब्दांत मांडता येणार नसल्याचं ते म्हणाले. बिग बींचा हा ब्लॉग चाहत्यांमध्ये चर्चेत आला आहे.

‘आमच्या प्रेमळ कुटुंबीयांसारखीच शालिनी सिंह, अलाहाबाद (प्रयागराज) यांच्या निधनाच्या वृत्ताने मी खूप दु:खी आहे. अशा प्रसंगी सर्वांत जास्त कठीण आणि वेदनादायी गोष्ट असते, ती म्हणजे शब्दांत व्यक्त होणं. अशा वेळी फक्त प्रेम, आशीर्वाद आणि संवेदनाच व्यक्त करू शकतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो’, अशा शब्दांत ते व्यक्त झाले. बिग बींसाठी त्यांचे चाहते किती महत्त्वाचे आहेत, हे या पोस्टमधून सहज स्पष्ट होत आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

दर रविवारी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ते आवर्जून बंगल्याबाहेर येतात आणि चाहत्यांना अभिवादन करतात. चाहते हे त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहेत. म्हणूनच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ते असेही पोस्ट लिहितात, ज्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडतो. बिग  बींना नेमकं काय म्हणायचं आहे, यावरून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू होते.

अमिताभ बच्चन हे नुकतेच ‘वेट्टैयन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. टीजे ज्ञानवेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये त्यांनी रजनीकांत आणि फहाद फासिल यांच्यासोबत काम केलं होतं. सध्या ते ‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वेलसाठी शूटिंग करत आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात ते कमल हासन आणि प्रभास यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. वयाची ऐंशी ओलांडल्यानंतरही ते चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. शिवाय ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमधूनही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us