
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे आजची प्रचंड वेगाने काम करतात आणि त्यासोबतच ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात. X वर तसेच इतर प्लॅटफॉर्वरही ते बऱ्याचदा पोस्ट टाकत असतात.फेसबूरवरही ते त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही अपडेट्स देतात. हेच बिग बी अनेकदा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे सार्वजनिक ठिकाणी कौतुक करतात. पण ते त्यांची पत्नी जया बच्चन तसेच सूनबाई ऐश्वर्या यांचं समाजमाध्यमांवर कधीच कौतुक का करत नाहीत असा सवाल विचारत एका यूजरने त्याना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर बिग बी यांनी थेट उत्तर दिलं, सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.
शहेनशाह नावानेही ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला त्यांच्या ‘कालिधर लपता’ या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा देऊन त्याचे कौतुक केले होते. पण त्यावर एका सोशल मीडिया युजरने अमिताभ बच्चन यांना सवाल विचारला. मुलासाठी तुम्ही कौतुकाचे पूल बांधता मग पत्नी जया बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांचे कौतुक का करत नाहीत? अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते त्यांच्या घराबाहेर चाहत्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. या पोस्टवर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ‘हो, मी अभिषेकची प्रशंसा करतो, मग?’
त्याच पोस्टवर एका यूजरने त्यांना सवाल विचारला, ‘ मग तुम्ही तुमच्या मुलीचे, सूनचे, पत्नीचेही असेच कौतुक करायला हवे.’. यावर अमिताभ बच्चन यांनी अतिशय सभ्य शब्दांत उत्तर दिलं. ‘हो, मी त्यांची प्रशंसा करतो… माझ्या मनात… सार्वजनिकरित्या नाही… महिलांचा आदर करणे महत्त्वाचे आहे.’ असं बिग बी यांनी लिहीलं.
याच पोस्टवर, जेव्हा एका युजरने त्यांच्या चाहत्यांना ‘पेड फॅन्स’ म्हटले, तेव्हा अमिताभ बच्चन यांनीही क्षणाचाही विलंब न करता योग्य उत्तर दिले. त्यांनी लिहिले, ‘सिद्ध करा! तुम्ही संकुचित मनाचे आहात… स्वतः पैसे देऊन तुमचे चाहते खरेदी करा.’ तर दुसऱ्या यूजरने अभिषेक बच्चनला ‘कुटुंबातील सर्वात जबाबदार आणि प्रौढ व्यक्ती’ असं संबोधले, त्यावरही अमिताभ यांनी उत्तर दिले, ‘त्याच्याकडे सर्वांसाठी प्रेम, आदर, प्रतिष्ठा आणि काळजी आहे.’ मात्र त्याच वेळी, जेव्हा एका व्यक्तीने जलसाच्या बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना ‘बेरोजगार’ म्हटले तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हसून उत्तर दिले, ‘मग त्यांना नोकऱ्या द्या? जेव्हा ते जलसाच्या बाहेर उभे असतात तेव्हा ते प्रेमात मग्न असतात.’
तर आणखी एका यूजपने त्यांना विचारला, या जगात, प्रत्येकजण त्याच्या हिश्शाच घेऊन जन्माला आला आहे. अभिषेक त्याच्या हिश्शाचं, तुम्ही तुमच्या हिश्शाचं आणि हरिवंश राय त्यांच्या हिश्शाचं.. म्हणून प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या जागी एक हिरो आहे. पण फक्त त्यांच्या स्वतःच्या पिढीसाठी. तुम्ही किती पिढ्यांचे ओझे वाहून नेणार आहात? त्यावरही अमिताभ यांनी अगदी चोख उत्तर दिलं. बिग बी यांचीही उत्तर सध्या सगळीकडे गाजत आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते शेवटचे Vettaiyan मध्ये दिसले होते. आता ते रामायण चित्रपटात झळकणार आहेत. तर अभिषेक बच्चन नुकताच ‘हाउसफुल 5’ मध्ये दिसला. त्यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खान, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, रणजीत, जॉनी लीवर, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, चंकी पांडे, डिनो मोरिया, सोनम बाजवा आणि सौंदर्या शर्मा असे अनेक कलाकारही झळकले.