Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांना पुन्हा धमकी, आता थेट जलसा बंगल्याबाहेरच…पोलीस तातडीने अलर्ट मोडवर!
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराचा कट उधळल्यानंतर आता खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंगने पुन्हा धमकी दिली आहे.

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे सध्या चांगलेच आहेत. काल त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट रचणाऱ्या दोघांना दिल्ली आणि मुंबईत अटक करण्यात आली. त्यानंतर आता खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंगने पुन्हा अमिताभ बच्चन यांना धमकी दिली आहे. मुंबईतील अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर खलिस्तान समर्थकांना जमण्याचे आवाहन गुरपतवंतने केले आहे.
१९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत पन्नूने अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले आहे. १९ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आंदोलन करण्याचे आवाहन गुरपतवंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. ‘जलसा’बाहेर कथित खलिस्तान जलसा आयोजित करण्यासाठी ११ लाख रुपयांचे बक्षिसाचे आमिषही देण्यात आले आहे.
कालही मिळाली होती धमकी
काल अमिताभ बच्चन यांच्या जलसा निवासस्थानाबाहेर गोळीबाराचा कट उधळण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाडून आणि मुंबईतून दोघांना अटक करण्यात आली आहे. दिपक सिंह उर्फ दीप याला ठाण्यातून तर, तर विकास ठाकूर उर्फ विकी याला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा अमिताभ बच्चन यांना धमकी देण्यात आली आहे. थेट त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर खलिस्तान समर्थकांना जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींना अटक
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर एक आरोपी बंगल्याबाहेर रेकी करत, गोळीबाराचा कट रचत होता, त्याचे बिष्णोई गँग सोबत होता. तो सर्वात आधी अनमोस बिष्णोईसाठी काम करत होता. परंतू अनमोल याला मुंबई आणलं, त्यानंतर एजन्सीने कारवाई केली, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.