Amitabh Bachchan : मनाची तयारी आहे, पण शरीर साथ देत नाहीये…अमिताभ बच्चन यांनी दिली हेल्थ अपडेट; चाहते चिंतेत

Amitabh Bachchan Health Update : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हेल्थ अपडेट दिली आहे.

Amitabh Bachchan : मनाची तयारी आहे, पण शरीर साथ देत नाहीये...अमिताभ बच्चन यांनी दिली हेल्थ अपडेट; चाहते चिंतेत
| Updated on: Nov 03, 2026 | 3:07 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडेच, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल मनमोकळेपणानं भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, आजकाल त्यांना कधीकधी झोपायला त्रास होतो. ते नियमितपणे जिममध्ये जाण्याचाही प्रयत्न करत आहेत, पण वाढत्या वयामुळे त्यांच्या शरीराला आपल्या मर्यादा जाणवू लागल्या आहेत. अमिताभ बच्चन म्हणाले की, ते व्यायामासाठी नेहमी तयार असले तरी, त्यांचं शरीर कधीकधी विश्रांती घेण्यास सांगतं.

अमिताभ बच्चन यांनी दिली हेल्थ अपडेट

Loading...

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, काल रात्री आपला ब्लॉग पूर्ण न केल्याचा विचार त्यांच्या मनात सतत येत होता, ज्यामुळे त्यांना लवकर जाग आली. अमिताभ बच्चन यांनी लिहिलं की, ‘लिहिताना फॉन्टचा आकार बदलण्यात मला अजूनही अडचण येत आहे. जर कोणाला हे कसं करायचं हे माहित असेल, तर कृपया मला समजावून सांगा. मी गुगलवरही शोधलं, पण तिथल्या सूचना समजण्यासारख्या वाटल्या नाहीत. काल रात्रीच लिहायला हवं होतं, असं वाटल्यामुळे आज मला थोडी लवकर जाग आली. आता मला आशा आहे की, शक्य झाल्यास मला पुन्हा झोप लागेल.’

 

अमिताभ यांनी पुढे स्पष्ट केलं की, ‘झोप येण्यासाठी सोशल मीडियावर विविध प्रकार सांगितले आहेत. मी ते सर्व वापरून पाहिले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे, नैसर्गिकरित्या झोपण्याचा प्रयत्न करणं सर्वोत्तम आहे. ब्लँकेटमध्ये स्वतःला गुंडाळून घ्या आणि जसं तुम्ही या जगात येण्यापूर्वी तुमच्या आईच्या गर्भात होता, तसंच वळून बसा आणि मग तुम्हाला झोप लागते. आता मी आराम करणार आहे.’

अमिताभ यांनी त्यांच्या फिटनेसविषयीही सांगितलं. त्यांनी सांगितलं की, आजकाल ते नियमितपणे जिममध्ये जाऊ शकलेले नाहीत आणि आपला व्यायामाचा दिनक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिग बी यांनी लिहिलं की, ‘माझा जिमचा दिनक्रम विस्कळीत झाला आहे, त्यामुळे मी तो पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. सततच्या कामामुळे शरीर आणि मन दोन्ही थकून जातात आणि अशा परिस्थितीत आपण स्वतःकडे थोडं अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. मन म्हणतं, ‘हो, व्यायाम कर,’ पण शरीर म्हणतं, ‘थांब जरा.’ आता शरीर साथ देत नाहीये. तरीही, मला प्रयत्न करायलाच हवा आणि मी तो करेन.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us