महानायकाचं ट्विटर अकाऊंट हॅक, प्रोफाईल फोटोत इम्रान खान

बॉलिवडूचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. त्यामुळे अमिताभ यांच्याऐवजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो प्रोफाईलवर दिसतो आहे.

महानायकाचं ट्विटर अकाऊंट हॅक, प्रोफाईल फोटोत इम्रान खान
Follow us
| Updated on: Jun 11, 2019 | 10:35 AM

मुंबई : बॉलिवडूचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. सोमवारी रात्री उशिरा अमिताभ यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले. हॅकर्सने अमिताभ यांच्या प्रोफाईलचा फोटो काढून चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो ठेवला. त्याशिवाय हॅकर्सने प्रोफाईलमधील माहिती  बदलून त्यात लव पाकिस्तान असे लिहले होते. मात्र काही तासांपूर्वी अमिताभ यांचे अकाऊंट पूर्ववत झालं.

अमिताभ याचे ट्विटर अकाऊंट तुर्कीश हॅकर्सने हॅक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारण अमिताभ यांच्या ट्विटरवर हॅक केल्यानंतर हॅकर्सने दोन ट्विट केले. त्यातील एक ट्विट तुर्कीच्या फुटबॉल टीमला समर्थन देणार होतं. तर दुसरे ट्विट भारतातील मुसलमान समाजाबाबत होते. त्यासोबतच हॅकर्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर लिंक करुन आम्ही तुमच्या समर्थनाची वाट पाहत आहोत असे लिहून ट्विट केले.

काही वेळानंतर अमिताभ यांना ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं कळताच त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर यूनिटने अमिताभ बच्चन यांचे अकाऊंट हॅक झाल्याची सांगितले. त्याशिवाय याबाबतची चौकशी सुरु आहे असेही पोलिसांनी ट्विट केले.

Ayyıldız Tim यांनी अमिताभ यांचे ट्विटर हॅक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Ayyıldız Tim हा ग्रुप स्वत:ला तुर्की हॅकर्स असण्याचा दावा करतो. तसेच यापूर्वी या ग्रुपने शाहिद कपूर, अनुपम खेर यांसह विविध बॉलिवूड अभिनेत्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केले आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.