‘अमिताभ बच्चन असं होऊ देणार नाही…’, ऐश्वर्या – अभिषेक यांचा होणार घटस्फोट? मोठी माहिती समोर

बच्चन कुटुंबापासून विभक्त होणार ऐश्वर्या राय, अभिषेक - ऐश्वर्या यांचा होणार घटस्फोट? दोघांच्या नात्याबद्दल अखेर मोठी माहिती समोर, अमिताभ बच्चन घेणार पुढाकार... गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा...

'अमिताभ बच्चन असं होऊ देणार नाही...', ऐश्वर्या - अभिषेक  यांचा होणार घटस्फोट? मोठी माहिती समोर
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 7:47 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री अभिषेक बच्चन यांच्या खासगी आयुष्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सांगायचं झालं तर, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात ऐश्वर्या आणि आराध्या एकट्या आल्या, तर अभिषेक कुटुंबियांसोबत लग्नासाठी पोहोचला. तेव्हापासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना सिने जर्नलिस्ट पूजा समंत यांनी दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आणि महानायक अमिताभ बच्चन असं काही होऊ देणार नाही… असं देखील पूजा म्हणाल्या.

नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये पूजा समंत यांनी ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहे. जर्नलिस्ट म्हणून माझ्या कानावर देखील अनेक गोष्टी आल्या. पण मला वाटत नाही ते दोघे विभक्त होतील. अधिकृतरित्या तर अशी कोणती माहिती समोर आलेली नाही.’

‘अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसले नाही. अंबानी यांच्या लग्न सोहळ्यात देखील ऐश्वर्या – अभिषेक एकत्र दिसले नाहीत. त्यानंतर देखील दोन ठिकाणी अभिषेक, ऐश्वर्या सोबत नव्हता. ऐश्वर्या तिची लेक आराध्या हिच्यासोबत दिसली. पण दोघे विभक्त झाले आहेत अशी माहिती समोर आलेली नाही. जर खरंच असं काही असेल तर, सत्य लोकांसमोर कधीतरी येईलच… पण अद्यापतरी असं काहीही नाही…’

अमिताभ बच्चन होऊ देणार नाही…

पूजा पुढे म्हणाल्या, ‘मला असं वाटतं अमिताभ बच्चन कुटुंबातील मुख्य आहेत आणि ते असं काहीही होऊ देणार नाहीत. ते स्वतः इंडस्ट्रीमधील आहेत. 55 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी मोठ्या पडद्यावर राज्य केलं आहे. जया बच्चन देखील प्रसिद्ध अभिनेत्री होऊन गेल्या आहेत. दोघांच्या नात्यात देखील अनेक चढ – उतार आले. पण आजही दोघे एकत्र आहेत. त्यामुळे बच्चन कुटुंबात असं काही होईल वाटत नाही…’ सध्या सर्वत्र ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगलेली आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.