
बॉलिवूडमध्ये असे बरेच अफेअर, लग्न आणि घटस्फोट आहेत जे कायम लक्षात राहणारे आणि चर्चेत राहणारे आहेत. यातील एक जोडी अशी आहे ज्या जोडीच्या नात्याची घटस्फोटानंतरही चर्चा होते. या अभिनेत्रीने चक्क 32 व्या वर्षी 20 वर्षाच्या अभिनेत्यासोबत लग्न केलं. मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोटही झाला. पण आजही त्यांच्याबद्दल चर्चा केली जाते.
80sमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख
एवढंच नाही तर 80sमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं. ही अभिनेत्री म्हणजे अमृता सिंह आणि सैफ अली खान. अमृता सिंहने अभिनेता सनी देओल सोबतच ‘बेताब’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. दोघांचाही तो पहिलाच चित्रपट होता. ‘बेताब’ हा सनी देओलचाच नाही तर अमृताचाही पहिला चित्रपट होता. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे दोघांनाही खूप प्रसिद्धी मिळाली होती.
अफेअर्स ते मोडलेला साखरपुडा
अमृताने 80 आणि 90 च्या दशकात धुमाकूळ घातला होता. पण तिचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. असे म्हटले जाते की अमृता आणि सनी यांचे बेताबच्या सेटवर प्रेम फुलले होते असं म्हटलं जायचं. पण हे नाते लवकरच संपुष्टात आले. शीख कुटुंबात वाढलेल्या अमृताचा जन्म 9 फेब्रुवारी 1958 रोजी पाकिस्तानातील हदली येथे झाला. तिचे नाव दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याशीही जोडले गेले होते. एवढंच नाही तर अमृता आणि माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री हे देखील रिलेशनमध्ये असल्याचंही म्हटलं जायचे. दोघांचाही साखरपुडा झाल्याचंही म्हटलं जायचं आहे. मतभेदांमुळे हे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.
अखेर 32 वर्षांची असताना केलं 20 वर्षांच्या अभिनेत्याशी लग्न
त्यानंतर अमृताच्या आयुष्यात नवाब सैफ अली खान आला. सैफ अली खान तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होता. सैफ आणि अमृता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनीही 1991 मध्ये त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं. त्यावेळी सैफने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणही केल नव्हतं. लग्नाच्या वेळी सैफ फक्त 20 वर्षांचा होता आणि अमृता 32 वर्षांची होती. नंतर, त्यांच्या आयुष्यात मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिमचे आगमन झाले. पण 13 वर्षांनी हे नाते संपुष्टात आले. 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर 5 कोटी रुपयांची पोटगी दिली होती.
घटस्फोटानंतर कोटींच्या रक्कमेत पोटगी दिली
घटस्फोटानंतर बऱ्याच वर्षांनी सैफने करीना कपूर डेट केलं आणि सुमारे पाच वर्ष डेट केल्यानंतर त्याने करीनाशी दुसरे लग्न केले. पण अमृता सिंह आजही तिच्या मुलांसह राहते. तिने पुन्हा लग्न केले नाही आणि वयाच्या 67 व्या वर्षी ती मुलांसोबत वेळ घालवते.