चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादावर अमृता फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

'तर मी तिला या गाण्यावर...', चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उर्फी जावेदबद्दल अमृता फडणवीस 'हे' काय म्हणाल्या

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादावर अमृता फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया
उर्फीच्या कपड्यांवर अमृता फडणवीस म्हणाल्या, 'सार्वजनिक ठिकाणी तरी...'
| Updated on: Jan 07, 2023 | 8:54 AM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या गाण्याची चर्चा आहे. ६ जानेवारीला अमृता फडणवीस यांचं ‘आज मै मूड बणा लेया’ गाणं प्रदर्शित झालं. गाणं प्रदर्शित होताच काही क्षणात लोकप्रिय झालं. कायम गाण्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी चॅरिटीसाठी देखील अनेक लाईव्ह शो केले आहेत. त्यांचे गाणे कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय त्या त्यांच्या परखड वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना ‘आज मै मूड बणा लेया’ गाण्याच्या लाँच दरम्यान उर्फी जावेद वादाबद्दल विचारलं.

उर्फी जावेद प्रकरणावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मला या विषयावर नक्की बोलायला आवडेल. पण ही ती वेळ नाही. आज मी फक्त आणि फक्त ‘आज मै मूड बणा लेया’ यावर बोलेल आणि सर्वांना या गाण्यावर थिरकायला लावेल… गाण्यावर तुम्ही देखील डान्स करा आणि उर्फीला देखील डान्स करायला सांगा…’ असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.

 

 

सध्या सर्वत्र अमृता फडणवीस यांच्या ‘आज मै मूड बणा लेया’ गाण्याची चर्चा आहे. अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र त्यांना गायनाची प्रचंड आवड आहे. याआधीही त्यांचे म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अमृता यांच्या या नव्या गाण्याची निर्मिती टी-सीरिज या ब्रँडने केली आहे. या गाण्याचे बोल, अमृता यांचा डान्स यासोबतच म्युझिक व्हिडीओतील त्यांचा ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना आवडला आहे.

अमृता फडणवीस अनोखी फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे त्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे नवीन गाणंसुद्धा हिट ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

अमृता फडणवीस यांची याआधी देखील आनेक गाणी प्रदर्शित झाले आहेत. बँकर असलेल्या अमृता कायम गायनाच्या माध्यमातून स्वतःची आवड जोपासताना दिसतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या गाण्यांची चर्चा कायम रंगलेली असते.