Radhika Merchant | अंबानींच्या होणाऱ्या सुनेची एवढुशी बॅग; त्या किंमतीत मुंबईत खरेदी करू शकता घर-गाडी

राधिकाच्या हातातील ही बॅग चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे त्या बॅगची साइज आणि किंमत. ही बॅग रोज गोल्ड, स्पिनेल जेमस्टोन, व्हाइट गोल्ड, सॉलिड सिल्वर आणि डायमंड्सने सजवण्यात आली आहे. ही हर्मीस केली मॉर्फोस ब्रँडची बॅग उच्च दर्जाच्या स्टर्लिंग चांदीने बनवण्यात आली आहे.

| Updated on: Apr 05, 2023 | 8:17 AM
1 / 5
अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंट ही फॅशन आयकॉन म्हणूनही ओळखली जाते. तिच्या स्टाइल आणि लूकची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. नुकत्याच पार पडलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला तिचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला.

2 / 5

या कार्यक्रमाला फक्त देशातील नव्हे तर परदेशातील नामांकित सेलिब्रिटीही उपस्थित होते. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात राधिकाने पहिल्या दिवशी काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. मात्र या साडीपेक्षा तिच्या हातातील छोट्याशा बॅगने सर्वांचं लक्ष वेधलं.

3 / 5

राधिकाच्या हातातील ही बॅग चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे त्या बॅगची साइज आणि किंमत. ही बॅग रोज गोल्ड, स्पिनेल जेमस्टोन, व्हाइट गोल्ड, सॉलिड सिल्वर आणि डायमंड्सने सजवण्यात आली आहे. ही हर्मीस केली मॉर्फोस ब्रँडची बॅग उच्च दर्जाच्या स्टर्लिंग चांदीने बनवण्यात आली आहे.

4 / 5

जेन फाइंड अॅपने दिलेल्या माहितीनुसार या बॅगची किंमत तब्बल 1 कोटी 93 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्ही एक घर आणि एक कारसुद्धा खरेदी करू शकता.

5 / 5

राधिका लवकरच अंबानी कुटुंबाची सून होणार आहे. जानेवारी महिन्यात तिचा आणि अनंत अंबानीचा साखरपुडा पार पडला होता. अद्याप या दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली नाही. राधिकाने तिच्या फॅशन आणि लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us