
मुंबई : बॉलिवुड अभिनेता सनी देओलचा 66 वा वाढदिवस पार पडला. सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला. तर सनी देओलचा ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ‘गदर 2’ या चित्रपटातून सनी देओलने शानदार असे पुनरागमन केले आहे. तसेच या चित्रपटामुळे सनी देओल चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. त्यामुळे सनी देओल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
सनी देओलबद्दल विशेष सांगायचं झालं तर त्याने वयाच्या 65 व्या वर्षी जे घवघवीत यश मिळवलं आहे ते संजय दत्त किंवा अनिल कपूर हे दोघे सुद्धा मिळू शकलेले नाहीयेत. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती सनी देओलची. गदर 2 चित्रपट हा प्रदर्शित झाल्यानंतर चांगला सुपरहिट ठरला. प्रेक्षकांना या चित्रपटाने अगदी वेड लावले होते. हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील चांगलाच गाजला. तसेच सनी देओलच्या या चित्रपटाने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
मागील काही काळापासून सनी देओल फारसे चित्रपट करत नव्हता. पण त्याने गदर 2 मधून पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं आणि या चित्रपटानंतर तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. आता त्याचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या संख्येत आहे. तसेच गदर 2 या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली.
आणखी एक खास गोष्ट सांगायची झाली तर सनी देओल हा अभिनेता 500 कोटींचा टप्पा पार करणारा सर्वात वयस्कर असा अभिनेता ठरला आहे. ही कमाल संजय दत्त किंवा अनिल कपूर देखील आजपर्यंत करू शकले नाहीत. तर सनी देओलने केलेले हे पुनरागमन त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठं गिफ्टच ठरलं आहे.
आतापर्यंतच्या सनी देओलच्या करियरबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 1983 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मग गदर, बॉर्डर, घायाळ, माँ तुझे सलाम, जानी दुश्मन, बिग ब्रदर, चुप, यमला पगला दिवाना अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.