तुझ्या आईने वडिलांना अशीच लाथ.. सासूचं बोलणं ऐकून भडकली अंकिता; म्हणाली “माझ्या आईवडिलांना..”

टेलिव्हिजनवरील सर्वांत वादगस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीमध्ये सतत भांडणं पहायला मिळत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अंकिता आणि तिच्या सासूमध्ये बराच ड्रामा पहायला मिळाला.

तुझ्या आईने वडिलांना अशीच लाथ.. सासूचं बोलणं ऐकून भडकली अंकिता; म्हणाली माझ्या आईवडिलांना..
Ankita Lokhande's mother in law
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 09, 2024 | 11:00 AM

मुंबई : 9 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’मध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. बिग बॉसच्या घरात सर्वांत आधी अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची आई आली. आपल्या आईची भेट घेतल्यानंतर अंकिता अत्यंत भावूक झाली होती. मात्र तिच्या सासूचं वक्तव्य ऐकल्यानंतर अंकिताचा राग अनावर झाला. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये विकीची आई म्हणजेच अंकिताची सासू तिच्याशी बोलताना दिसतेय. अंकिताने विकीला लाथ मारल्याबद्दल सासू बोलत असतात. ते ऐकून अंकिता भडकते.

विकी जैनची आई रंजना जैन या आपल्या अनोख्या अंदाजात बिग बॉसच्या घरात एण्ट्री करतात. शेर म्हणत त्या बिग बॉसच्या घरात येतात. ‘तुमने ऐसी कला जीने की कहां से सीखीं, मैंने समंदर से सीखा है जीने का सलीका. चुप-चाप से बहना और मौज में रहना’, हा शेर म्हणत त्या येतात. विकीच्या आईचा हा शेर ऐकून सर्वजण हसू लागतात आणि मजा-मस्ती सुरू होते. मात्र घरातील हे हलकंफुलकं वातावरण फार काळ टिकत नाही. कारण त्यानंतर काही वेळाने अंकिता आणि विकीच्या आईमध्ये जोरदार वादाला सुरुवात होते.

सासूवर भडकली अंकिता

या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की विकीची आई त्या घटनेचा उल्लेख करते, ज्यादिवशी अंकिताने विकीला लाथ मारली होती. त्या म्हणतात, “ज्या दिवशी तू लाथ मारली होती ना, त्याच दिवशी मी तुझ्या मम्मीला कॉल केला आणि विचारलं की तुम्हीसुद्धा तुमच्या पतीला अशा पद्धतीने लाथ मारायचे का?” हे ऐकून अंकिताचा राग अनावर होतो. ती म्हणते, “मम्मीला फोन करायची काय गरज होती?” यावर विकीची आई म्हणते, “म्हणजे तू विचार कर की मला किती वाईट वाटलं असेल.” यानंतर अंकिता विनंती करते, “माझ्या वडिलांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालंय मम्मी. तुम्ही माझ्या आईवडिलांबद्दल काही बोलू नका प्लीज.”

बिग बॉसचा हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण विकीच्या आईवर टीका करत आहेत. अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निधन झालं होतं. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात अंकिता आणि विकी बिग बॉसच्या घरात दाखल झाले.