Ankita Lokhande: पूजेच्या व्हिडीओवरून अंकितावर भडकले नेटकरी; म्हणाले..

गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकलेली अंकिता अनेकदा तिच्या पतीसोबत (Vicky Jain) फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Ankita Lokhande: पूजेच्या व्हिडीओवरून अंकितावर भडकले नेटकरी; म्हणाले..
अंकिता लोखंडे ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 09, 2022 | 7:23 PM

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकलेली अंकिता अनेकदा तिच्या पतीसोबत (Vicky Jain) फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता जैन (Jain) परंपरेनुसार पूजा करताना दिसत आहे.

काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अंकिता रितीरिवाजानुसार पूजा करताना दिसत आहे. मात्र व्हिडीओमधील तिचं कृत्य पाहून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. युजर्स तिला या व्हिडीओवरून ट्रोल करत आहेत. या व्हिडिओमध्ये अंकिता लाल रंगाच्या साडीत ट्रेडिशनल अंदाजात दिसत आहे. तर तिचा पती विकी जैनदेखील पारंपारिक पोशाखात पहायला मिळत आहे. मात्र पूजेदरम्यान अंकिताच्या काही कृती नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या नाहीत. अनेकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

या व्हिडिओमध्ये अंकिता डान्स करताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती पूजेदरम्यान कॅमेरासमोर पोज देतानाही दिसत आहे. नेटकऱ्यांना तिचं हे वागणं आवडलं नाही आणि त्यांनी कमेंट करून तिला प्रचंड ट्रोल केलं. एका यूजरने कमेंट करताना लिहिलं, ‘पूजेदरम्यानही डान्स सुरू आहे.’ त्याचवेळी दुसऱ्याने लिहिलं, ‘देवाचा तरी आदर करा, इथेही नौटंकी सुरू आहे.’ तर सर्वकाही रेकॉर्ड करणं आवश्यक आहे का, असंही एकाने म्हटलंय.

काही नेटकरी अंकितावर टीका करत असले तरी काहींना तिची ही धार्मिक बाजू आवडली आहे. लग्नानंतर प्रत्येक पूजा परंपरेनुसार पार पाडत असल्याचं पाहून छान वाटतं, असं तिच्या चाहत्यांनी म्हटलंय. अंकिता आणि विकीने डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.