AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Lokhande | बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे हिचे भांडण, थेट दिली मोठी धमकी

बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 च्या घरात सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धेक मनारा चोप्रा ही ठरलीये. विशेष म्हणजे चाहत्यांना मनारा चोप्रा हिचा गेम आवडताना देखील दिसतोय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

Ankita Lokhande | बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे हिचे भांडण, थेट दिली मोठी धमकी
| Updated on: Oct 20, 2023 | 7:02 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चा प्रिमियर होऊन पाच दिवस झाले. मात्र, इतक्या कमी दिवसांमध्ये बिग बॉस 17 मोठे वाद होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 च्या प्रिमियरमध्ये सलमान खान (Salman Khan) हा जबदस्त असा डान्स करताना दिसला. मध्यंतरी चर्चा होती की, बिग बॉस 17 ला सलमान खान हा होस्ट करणार नाहीये. यानंतर चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली.

सलमान खान हा आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो बिग बॉस 17 होस्ट करणार नसल्याचे देखील सांगण्यात आले. परत एकदा बिग बॉसच्या यंदाच्या सीजनला देखील सलमान खान होस्ट करत असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय. आता विकेंडला सलमान खान हा घरातीस सदस्यांचा क्लास लावताना दिसेल.

बिग बॉस 17 मध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन आणि नील भट्ट यांच्यामध्ये मोठी भांडणे घरात बघायला मिळाली. नुकताच बिग बॉस 17 चा एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा प्रोमो पाहून चाहते हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. अंकिता लोखंडे ही तूफान भांडणे करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अंकिता लोखंडे आणि सोनिया बंसल खानजादी यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. अंकिता लोखंडे ही सोनिया बंसल खानजादी हिला खडेबोल सुनावताना दिसली. यानंतर थेट सोनिया बंसल खानजादी म्हणाली की, मी तुझ्यासारख्या मालिका करत नाही. हे ऐकताच अंकिता लोखंडे हिचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळाले.

अंकिता थेट म्हणते की, तुझ्यासारख्या मी मालिका करत नाही, याचा अर्थ नेमका काय आहे? इतकेच नाही तर अंकिता लोखंडे ही थेट सोनिया बंसल खानजादी हिला म्हणते की, तू देखील टेलिव्हिजनवरच आहेस हे नको विसरू. यानंतर सोनिया बंसल खानजादी ही अंकिता लोखंडे हिच्या पुढे आपला मुद्दा स्पष्ट करताना दिसत आहे. यांचा वाद चांगलाच वाढल्याचे बघायला मिळाले.

Follow Us
5 राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर
5 राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर.
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.