
मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चा प्रिमियर होऊन पाच दिवस झाले. मात्र, इतक्या कमी दिवसांमध्ये बिग बॉस 17 मोठे वाद होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 च्या प्रिमियरमध्ये सलमान खान (Salman Khan) हा जबदस्त असा डान्स करताना दिसला. मध्यंतरी चर्चा होती की, बिग बॉस 17 ला सलमान खान हा होस्ट करणार नाहीये. यानंतर चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली.
सलमान खान हा आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो बिग बॉस 17 होस्ट करणार नसल्याचे देखील सांगण्यात आले. परत एकदा बिग बॉसच्या यंदाच्या सीजनला देखील सलमान खान होस्ट करत असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय. आता विकेंडला सलमान खान हा घरातीस सदस्यांचा क्लास लावताना दिसेल.
बिग बॉस 17 मध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन आणि नील भट्ट यांच्यामध्ये मोठी भांडणे घरात बघायला मिळाली. नुकताच बिग बॉस 17 चा एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा प्रोमो पाहून चाहते हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. अंकिता लोखंडे ही तूफान भांडणे करताना दिसत आहे.
अंकिता लोखंडे आणि सोनिया बंसल खानजादी यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. अंकिता लोखंडे ही सोनिया बंसल खानजादी हिला खडेबोल सुनावताना दिसली. यानंतर थेट सोनिया बंसल खानजादी म्हणाली की, मी तुझ्यासारख्या मालिका करत नाही. हे ऐकताच अंकिता लोखंडे हिचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळाले.
अंकिता थेट म्हणते की, तुझ्यासारख्या मी मालिका करत नाही, याचा अर्थ नेमका काय आहे? इतकेच नाही तर अंकिता लोखंडे ही थेट सोनिया बंसल खानजादी हिला म्हणते की, तू देखील टेलिव्हिजनवरच आहेस हे नको विसरू. यानंतर सोनिया बंसल खानजादी ही अंकिता लोखंडे हिच्या पुढे आपला मुद्दा स्पष्ट करताना दिसत आहे. यांचा वाद चांगलाच वाढल्याचे बघायला मिळाले.