Ankita Lokhande : कोट्यवधींचं फार्महाउस, 8 BHK आलिशान फ्लॅट अन्…कोळसा व्यापाऱ्याची पत्नी आहे मराठमोळी अभिनेत्री, जगतेय राणीसारखं आयुष्य
Tv Actress : मराठमोळ्या अभिनेत्रीनं कोळसा व्यापाऱ्याशी लग्न केलं असून ती कोट्यवधींची मालकीण आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही टेलिव्हिजनची लोकप्रिय जोडी आहे. 'स्मार्ट जोडी' आणि 'बिग बॉस' सारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे, ते सर्वात लाडक्या टीव्ही सेलिब्रिटींपैकी एक बनले आहेत.
अंकिता एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तर विकी कोळशाचा व्यापारी आहे आणि सध्या त्याची लोकप्रियता वाढतच चालली आहे.
अंकिताचे सासरचे लोक छत्तीसगडमधील बिलासपूर येथे राहतात. अभिनेत्रीनं पूर्वी एका जुन्या यूट्यूब व्लॉगमध्ये तिच्या सासरच्या आलिशान घराची एक झलक दाखवली होती. तिनं विकीचं मोठं फार्महाऊस, आंतरराष्ट्रीय शाळा आणि कॉलेजसुद्धा दाखवलं होतं.
विकीच्या फार्महाऊसमध्ये भाज्या आणि फळं पिकवली जातात. फार्मवर चिकू, डाळिंब, ब्रोकोली, शेवग्याच्या शेंगा आणि भोपळा यांसह जवळजवळ सर्व काही पिकवलं जातं. अंकितानं हेही सांगितलं की, त्यांच्या मालकीची एक गोशाळा आहे.
त्याच व्हिडिओमध्ये, अंकिता, विकी आणि त्यांचं कुटुंब विकीच्या कुटुंबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय शाळेला भेट देताना दिसले. त्यांनी सांगितलं की, विकीची वहिनी, रेशू जैन, या शाळेच्या संचालिका आहेत. रेशू जैन यांनी त्यांची केबिनसुद्धा दाखवली.
विकी जैन छत्तीसगडमधील रायपूर येथील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे. त्याचे आई-वडील, विनोद कुमार जैन आणि रंजना जैन, त्याच्यासोबत मिळून कुटुंबाचा कोळसा खाणीचा व्यवसाय चालवतात. विकीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यानं जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (JBIMS) मधून एमबीए केलं.
विकी जैन आणि अंकिता लोखंडे मुंबईतील एका आलिशान 8 बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतात. मुंबईत त्यांच्या मालकीचं आणखी एक 3-बीएचके अपार्टमेंटसुद्धा आहे.