AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lagn Shubh Muhurt 2026: यंदा कर्तव्य आहे.. दोन महिन्यांत लग्नाचे 11 शुभ मुहूर्त; यादी पाहा अन् लगेच तारीख धरा!

तुमच्याही घरात यंदा कर्तव्य असेल किंवा तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यातील शुभ मुहूर्तांची तारीख आता समोर आली आहे. 

Lagn Shubh Muhurt 2026: यंदा कर्तव्य आहे.. दोन महिन्यांत लग्नाचे 11 शुभ मुहूर्त; यादी पाहा अन् लगेच तारीख धरा!
| Updated on: Nov 21, 2026 | 6:44 PM
Share

November December Vivah Lagn Muhurt:  तुळशी विवाह पार पडल्यानंतर घरोघरी लग्नाची लगबग सुरु होते. लग्नाआधी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे शुभ मुहूर्त पाहणे. विवाहासाठी शुभ मुहूर्त, वार, नक्षत्र, योग या सर्व गोष्टींचा विचार केला जातो अन् लग्न ठरवले जाते. तुमच्याही घरात यंदा कर्तव्य असेल किंवा तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यातील शुभ मुहूर्तांची तारीख आता समोर आली आहे.

नोव्हेंबर महिन्यातील लग्नाच्या शुभ तारखा!

21  नोव्हेंबर 2026, शनिवार: सकाळी 6.48  ते रात्री 12.8  (नोव्हेंबर 22) 24 नोव्हेंबर 2026, मंगळवार: रात्री 11.25 ते सकाळी 6. 52 (नोव्हेंबर 25) 25 नोव्हेंबर 2026, बुधवार: सकाळी 6.52  ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6.52 26 नोव्हेंबर2026,  गुरुवार: सकाळी 5.52  ते सायंकाळी 5.47

डिसेंबर 2026 मधील विवाहासाठी शुभ तारखा

2 डिसेंबर 2026 बुधवार 3 डिसेंबर 2026 गुरुवार 4 डिसेंबर 2026 शुक्रवार 5 डिसेंबर 2026 शनिवार 6 डिसेंबर 2026 रविवार 11 डिसेंबर 2026  शुक्रवार 12 डिसेंबर 2026 शनिवार

लग्नासाठी मुहूर्त पाहणे का महत्त्वाचे असते? 

लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम, नव्या प्रवासाला सुरुवात. त्यामुळे दोघांचे वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी ग्रहांची अनुकूलता, सकारात्मक सुरुवात महत्त्वाची असते. पंचांगामध्ये तिथी, नक्षत्र, वार, योग तसेच ग्रहांची योग्यस्थिती पाहून हा मुहूर्त ठरवला जातो.लग्नामध्ये केले जाणारे विधी म्हणजेच मंगलाष्टके तसेच इतर धार्मिक कार्ये ठरलेल्या वेळेत नीट पार पडण्यासाठी मुहूर्त पाहणे महत्त्वाचे असते.

आज तुळशीचे लग्न

दुसरीकडे आजपासून तुळशी विवाहाचे मुहूर्तही सुरु होत आहे पंचांगानुसार, यंदा तुळशी विवाह शनिवार, 21 नोव्हेंबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला हा विवाह सोहळा पार पडणार आहे मात्र लोक परंपरेनुसार कार्तिकी एकादशीनुसार त्रिपुरारी पोर्णिमेपर्यंत 20-24 नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही दिवशी तुळशीचे लग्न लावणे शुभ ठरेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू