AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivah Muhurta: सुरू झाला लग्नसराईचा सीझन! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नाचे किती शुभ मुहूर्त?

देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे झाले आहेत. त्यामुळे आता लग्नसमारंभासह सर्व शुभ आणि मंगलकार्यांना सुरुवात झाली आहे. चला तर जाणून घेऊया नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील विवाहाचे शुभ मुहूर्त.

Vivah Muhurta: सुरू झाला लग्नसराईचा सीझन! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नाचे किती शुभ मुहूर्त?
Vivah Muhurta Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Edited By: | Updated on: Nov 21, 2026 | 6:26 PM
Share

हिंदू धर्मात देवउठनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. यंदा २० नोव्हेंबर २०२६ रोजी देवउठनी एकादशी साजरी करण्यात आली. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. यासोबतच चातुर्मास संपतो आणि लग्न, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यांना सुरुवात होते. त्यामुळे आता लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अनेक जण विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, डिसेंबरच्या मध्यापासून खरमास सुरू होणार असल्याने काही काळासाठी विवाहासह इतर मंगलकार्यांना विराम मिळेल. त्यामुळे या दोन महिन्यांतील विवाहाचे शुभ मुहूर्त आणि खरमास सुरू होण्याची तारीख जाणून घेऊया.

नोव्हेंबर २०२६ मधील विवाहाचे शुभ मुहूर्त

देवउठनी एकादशीनंतर नोव्हेंबर महिन्यात विवाहासाठी चार शुभ तारखा उपलब्ध आहेत. या तारखांना लग्नाचे नियोजन करता येऊ शकते. • २१ नोव्हेंबर २०२६, शनिवार: सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपासून रात्री १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत (२२ नोव्हेंबर). • २४ नोव्हेंबर २०२६, मंगळवार: रात्री ११ वाजून २५ मिनिटांपासून सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत (२५ नोव्हेंबर). • २५ नोव्हेंबर २०२६, बुधवार: सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. • २६ नोव्हेंबर २०२६, गुरुवार: पहाटे ५ वाजून ५२ मिनिटांपासून संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत.

डिसेंबर २०२६ मधील विवाहाचे शुभ मुहूर्त

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांतही विवाहासाठी सात शुभ तारखा आहेत. त्यानंतर खरमास सुरू होणार असल्याने लग्नसमारंभ आणि इतर मंगलकार्यांना काही काळासाठी विराम मिळेल.

• २ डिसेंबर २०२६, बुधवार • ३ डिसेंबर २०२६, गुरुवार • ४ डिसेंबर २०२६, शुक्रवार • ५ डिसेंबर २०२६, शनिवार • ६ डिसेंबर २०२६, रविवार • ११ डिसेंबर २०२६, शुक्रवार • १२ डिसेंबर २०२६, शनिवार

डिसेंबरमध्ये कधी सुरू होणार खरमास?

हिंदू धर्मात खरमासाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतात, तेव्हा खरमास सुरू होतो. यंदा बुधवार, १६ डिसेंबर २०२६ रोजी खरमास सुरू होणार आहे. या दिवशी सकाळी साधारण १० वाजून २० ते १० वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यानंतर खरमास संपेल. म्हणेजच १४ जानेवारी २०२७, गुरुवारी, रात्री साधारण ९ वाजून १० मिनिटांनी खरमास समाप्ती होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू