मुंबई महापालिकेला पुन्हा धमकीचा मेल, अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याचा उल्लेख अन्…
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिका आणि महानायक अमिताभ बच्चन यांना धमकीचा मेल येत आहे. आता देखील सकाळी मुंबई महानगरपालिकेची ई-मेल आयडीवर धमकीचा मेल आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

मुंबई महापालिकेला पुन्हा धमकीचा मेल आला असल्याची माहिती समोर येत आहे. सतत येत असलेल्या धमकीच्या मेलमुळे खळबळ उडाली असून या मेलमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर महालक्ष्मी, सायन्स आचार्य मेट्रो स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेची ई-मेल आयडीवर सकाळी 10.12 मिनिटांनी मेल आला आहे. मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय मेयर ऑफिस उडवून टाकरण्याचती धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे.
एवढंच नाही तर, अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला उडवण्याची धमकी देखील या ई-मेल मध्ये देण्यात आली आहे. मुंबईमधील मेट्रो स्टेशन, महालक्ष्मी रेस कोर्स हे ठिकाण सुद्धा उडवण्याची धमकी या ई-मेल मध्ये देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या चार महिन्यांमध्ये पाच वेळा धमकीचा मेल आलेला आहे. यावर आता मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस प्रशासन कामय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यापूर्वी देखील महानायत अमिताभ बच्चन यांना जलसा या बंगल्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका ईमेलद्वारे मिळाली आहे. याव्यतिरिक्त, प्रसिद्ध गायक दलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टलाही ग्रेनेडने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली. सतत येत असलेल्या धमक्यांमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेत देखील मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
यापू्र्वी आलेल्या धमकीच्या मेलनंतर बिग बी ‘जलसा’ बंगल्याबाहेर रविवारी चाहत्यांना भेटण्यासाठी तर आले, पण तेव्हा सुरक्षेची काळजी घेत बिग बी बुलेटप्रुफ काचेतून चाहत्यांच्या भेटीस आहे. तर धमकी देणाऱ्यांनी बुलेटप्रुफ काचेतून हल्ला करु… अशी धमकी देखील दिली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली
सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा अमिताभ बच्चन यांनी धमकीचा मेल आहे. आहे. अभिनेता सलमान खान, टायगर श्रॉफ, रोहित शेट्टी यांच्यावर थेट गोळीबार करण्यात आला. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. होणाऱ्या हल्ल्यांमुळे आणि सतत येणाऱ्या धमकांमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.