माझी आई त्याला बकरा म्हणते..; अनुराग कश्यपबद्दल 20 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडचा खुलासा
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप वयाच्या 53 व्या वर्षी 30 वर्षीय तरुणीला डेट करत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याच खासगी आयु्ष्याची चर्चा रंगली आहे. आता दिग्दर्शकाने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोन घटस्फोट झाल्यानंतर अनुराग वयाच्या 53 व्या वर्षी 30 वर्षांच्या एका तरुणीला डेट करत आहे. शुभ्रा शेट्टी असं अनुराग याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, शुभ्रा हिने अनुराग याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
अनुराग याच्यासोबत पहिल्या डेटचा किस्सा सांगत शुभ्रा शेट्टी म्हणाली, ‘माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. याचा अर्थ असा नाही की, मी त्याच्यासोबत बाहेर फिरायला जात नाही. पण एकदा डेटवर गेली असताना तेथे अचानक एका पत्रकाराने आम्हाला पाहिलं आणि आमच्या नात्याचा खुलासा त्याने केला.’
सांगायचं झालं तर, शुभ्रा हिच्या आई – वडिलांना देखील अनुराग भेटला आहे. अशात तिला विचारण्यात आलं की, नात्यावर तुझ्या आई – वडिलांची प्रतिक्रिया काय होती? यावर शुभ्रा म्हणाली, ‘माझी आई अनुराग याला बकरा म्हणून बोलावते. कारण तिचं म्हणणं आहे की, तो पागल आहे, जो तुझ्यासोबत राहत आहे. नात्यासाठी मी कधीच माझ्या आई – वडिलांकडे विनंती केली नाही..’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.
अनुराग याच्यासोबत असलेल्या नात्यावर शुभ्रा म्हणाली, ‘बॉम्हे वेलवेट सिनेमा प्रदर्शना पुर्वीचा आणि सिनेमा शुटिंगच्या नंतरचा काळ होता. तेव्हा अनुराग त्याच्या आयुष्याच्या चांगल्या टप्प्यावर होता. तो प्रचंड फिट आणि आनंदी होता. तो पुस्तकं वाचायचा, सिनेमा पाहायचा. याच कारणांमुळे आमची चांगली बॉन्डिग झाली. अनुराग कायम म्हणतो, जर मी त्याला काही वर्षांपूर्वी भेटली असती, तर त्याने मला डेट केलं नसतं. पण मला असं वाटत नाही. तो त्याच्या आयुष्याच्या चांगल्या काळात असताना मी त्याला भेटले..’, असं देखील शुभ्रा म्हणाली.
अनुराग थाटणार तिसरा संसार?
अनुराग कश्यप सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. याआधी दिग्दर्शकाने दोन लग्न केली. अनुराग याचं पहिलं लग्न आरती बजाज हिच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनुराग याने अभिनेत्री कल्की केक्ला हिच्यासोबत लग्न केलं. दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. आता त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.