अनुष्काने बाळाला आज नाही तर ‘या’ दिवशी दिलाय जन्म, खरी तारीख आली समोर

Anushka Sharma and Virat Kohli : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे यांच्या पर्सनल लाईफबद्दलही अनेक चर्चा रंगताना दिसतात. नुकताच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडून एक अत्यंत मोठी घोषणा ही करण्यात आलीये. ज्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

अनुष्काने बाळाला आज नाही तर 'या' दिवशी दिलाय जन्म, खरी तारीख आली समोर
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 10:21 PM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झालंय. दुसऱ्यांदा विराट आणि अनुष्का हे आई बाबा झालेत. 2021 मध्ये अनुष्का शर्मा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलीचे नाव वामिका ठेवले. हेच नाही तर अनेक वर्षे वामिकाचा चेहरा सर्वांपासून लपवून ठेवण्यात आला. मात्र, एका मॅचदरम्यान वामिका अनुष्का शर्माच्या कडेवर दिसली. वामिका हिचे फोटो पाहण्यासाठी चाहते हे कायमच आतुर असतात. आता त्यात विराट आणि अनुष्काच्या लेकाला बघायला सर्वजण उत्सुक आहेत.

आज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये त्यांनी मुलगा झाल्याचे सांगत त्याचे नावही जाहिर केले. हेच नाही तर आज जरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली असली तरीही अनुष्काने काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिलाय. याबद्दलची खुलासा हा करण्यात आलाय.

अनुष्का शर्मा हिने 15 फेब्रुवारी 2024 लाच बाळाला जन्म दिलाय. विशेष म्हणजे याबाबतचा देखील खुलासा या पोस्टमध्ये करण्यात आलाय. मुलगा झालाय याची घोषणा आज म्हणजे 20 फेब्रुवारी 2024 ला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडून करण्यात आलीये. आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पोस्ट ही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय.

चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करून विराट आणि अनुष्का यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. मध्यंतरी जोरदार चर्चा होती की, अनुष्का शर्मा ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे. मात्र, यावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून काहीच भाष्य हे करण्यात नाही आले. प्रेग्नंसीबद्दल त्यांनी लपवून ठेवले. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय.

अनुष्का शर्मा ही 2019 मध्ये शेवटी झिरो या चित्रपटात शाहरूख खान याच्यासोबत दिसली होती. मात्र, तो चित्रपट फ्लाॅप गेला. अनुष्का शर्मा ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असतानाही अनुष्का शर्मा ही कायमच चर्चेत असते. अनुष्का शर्मा ही बऱ्याच वेळा विराट कोहली याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर देखील उपस्थित असते. सोशल मीडियावरही अनुष्का शर्मा ही सक्रिय दिसते.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.