
न्यूझीलंडला पराभूत करत भारतीय क्रिकेट टीमने चॅम्पियन्सची ट्रॉफी पटकावली. सर्वच भारतीयांसाठी हा एक खास क्षण होता. सर्वच भारतीयांनी हा आनंद सेलिब्रेट केला. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हा खास सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होते. अभिनेता विवेक ओबेरॉयनेही टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी तिरंगा हाती घेत स्टेडियमवर उपस्थित होता. एवढंच नाही तर क्रिकेटरच्या पत्नीही ही फायनल बघण्यासाठी उपस्थित होत्या.
अनुष्काचा हटके लूक पाहायला मिळाला
जसं की विराटची बायको अभिनेत्री अनुष्का शर्मा, रोहित शर्माची बायको देखील भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आली होती. तसही अनुष्का अनेकदा स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येत असते. स्टेडिअमवरील तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. आणि प्रत्येकवेळी तिचा हटके लुक पाहायला मिळतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी अनुष्काने केली करोडोंची शॉपिंग
आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल वेळी देखील अनुष्काचा खास लुक पाहायला मिळाला. डेनिम शर्ट आणि डेनिम शॉर्ट्स, मोकळे केसं अन् नो मेकअप वाला लूक असा खास लूक चर्चेत आला आहे. यानंतर तिच्या या आऊटफिटची चर्चा होताना दिसत आहे. तिच्या डेनिम आऊटफिटसोबतच तिच्या हातातील दोन ब्रेसलेटचीही तेवढीच चर्चा होते. या संपूर्ण आऊटफिटची आणि ब्रेसलेटचीही किंमत जाणून धक्का बसेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये या लूकसाठी अनुष्काने करोडो रुपये खर्च केले आहेत.
अनुष्काच्या आऊटफिटची आणि ब्रेसलेटची किंमत तब्बल इतक्या कोटींच्या घरात
अनुष्कानं घातलेल्या डेनिम शर्टचीच किंमत तब्बल 28, 365 रुपये आहे, तर शॉट्सची किंमत 26 हजारांची आहे. तिच्या हातात असलेल्या एका ब्रेसलेटची किंमत चक्क 1 कोटी पंधरा लाख आहे. तर तिच्या हातातील दुसऱ्या एका ब्रेसलेटची किंमत तब्बल 15 लाख आहे. या चार गोष्टींसाठी अनुष्काने इतके कोटी रुपये खर्च केले.
दरम्यान भारताने विजय मिळवल्यावर अनुष्का विराटने या आनंदाच्या क्षणांचं सेलिब्रेशन केलं त्याचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने सर्वात आधी विराटला आनंदाने मिठी मारली आणि त्याच्या खेळाचं कौतुक केलं. तसेच पूर्ण टीमच कौतुक करत सर्वांना शुभेच्छाही दिल्या.