
अरबाज खान याने काही महिन्यांपूर्वीच शुरा खान हिच्यासोबत लग्न केले. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करतंय. आता अरबाज खानने देखील लग्न केले. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये अरबाजने शुरासोबत लग्न केले. अरबाज खान आणि शुराच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या लग्नाला मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा लेक अरहान खान हा देखील उपस्थित होता.
अरबाज खान आणि शुरा खान कायमच एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. नुकताच अरबाज खान आणि शुरा खान हे स्पाॅट झाले. अरबाज खान आणि शुराला पाहून पापाराझी फोटो काढण्यासाठी पोहचले. यावेळी अरबाज खान आणि शुराने फोटोसाठी खास पोझ दिल्या. मात्र, यानंतर अरबाज खान हा पापाराझींवर चांगलाच भडकला. पापाराझींना खडेबोल सुनावताना अरबाज दिसला.
अरबाज खान आणि शुरा यांनी फोटोसाठी पोझ दिल्या आणि ते निघून जात असताना पापाराझी हे मागून फोटो काढत होते. हीच गोष्ट अरबाज खानला पटली नाही आणि त्याने संताप व्यक्त केला. मागून फोटो काढण्यास मनाई करताना अरबाज खान दिसला. हेच नाही तर अरबाज खान म्हणाला, तुम्ही मागून काय करत आहात. आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने देखील मागून फोटो घेण्यास पापाराझींना मनाई केली. काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याच्या घरी मलायका अरोरा ही आपल्या मुलासोबत पोहचली होती. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
अरबाज खान हा सोहेल खान याच्यासोबत मुलगा अरहान खान याच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी दोघेही काही मोठे खुलासे करताना दिसले. मलायका अरोरा देखील अरहानच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी अरहान खान आणि अरबाज खानच्या काही सवयींबद्दल बोलताना मलायका अरोरा ही दिसली होती. यावेळी मलायकाने आपल्या प्रेग्नंसीबद्दलही खुलासा केला होता.