अर्जुन-मलायकाने भर कार्यक्रमात एकमेकांना केलं दुर्लक्ष; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ‘ब्रेकअप कन्फर्म’

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात हे दोघं एकमेकांसमोर आले, मात्र तरीही त्यांनी संवाद साधला नाही.

अर्जुन-मलायकाने भर कार्यक्रमात एकमेकांना केलं दुर्लक्ष; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ब्रेकअप कन्फर्म
Arjun Kapoor and Malaika Arora
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2025 | 3:33 PM

वयातील अंतर, एकमेकांचा भूतकाळ या सर्व गोष्टी बाजूला सारून अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांच्या प्रेमात पडले. सुरुवातीला त्यांनी नात्याबद्दल मौन बाळगणं पसंत केलं होतं. मात्र 2018 मध्ये सोशल मीडियावर त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली. आता जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र त्यावर अद्याप दोघांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता एका कार्यक्रमात दोघांना पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना खात्री पटली आहे की त्यांचं ब्रेकअप झालं आहे. अर्जुन आणि मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

शुक्रवारी नवी दिल्लीत पार पडलेल्या  ‘इंडिया काऊचर वीक 2024’ या फॅशन शोला अर्जुन आणि मलायका पोहोचले होते. कधीच एकमेकांचा हात न सोडणारी ही जोडी यावेळी मात्र एकमेकांपासून दूर बसलेली दिली. अर्जुन आणि मलायका हे पहिल्याच रांगेत पण एकमेकांपासून दूर बसले होते. त्यानंतर अर्जुन जेव्हा चाहत्यांसोबत सेल्फी क्लिक करत होता, तेव्हा मलायका त्याच्यासमोरच गेली, पण दोघं एकमेकांशी एका शब्दाने बोलले नाहीत. अर्जुनने चाहत्यांच्या घोळक्यातून मलायकासाठी वाट मोकळी करून दिली.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. ‘म्हणजेच दोघांचं ब्रेकअप कन्फर्म आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘सोशल डिस्टन्स खूप महत्त्वाचं असतं’, असं दुसऱ्याने उपरोधिकरित्या म्हटलंय. ‘या दोघांचं नेमकं काय चाललंय, कधी एकत्र तर कधी वेगळे असतात’, असं आणखी एकाने लिहिलं आहे.

यावर्षी मे महिन्यापासून अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान अर्जुनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही मलायका गैरहजर राहिली. इतकंच नव्हे तर तिने त्याच्यासाठी वाढदिवसाची पोस्टसुद्धा लिहिली नाही. अर्जुन आणि मलायका हे त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मात्र अप्रत्यक्षपणे टोमणे मारताना दिसत आहेत.

19 वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अर्जुनसोबतच्या नात्यामुळे मलायका अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.