शाहरुख खानच्या लेकामुळे रणबीर कपूर अडचणीत; मुंबई पोलीस करणार कारवाई?

आर्यन खानच्या "बॅड्स ऑफ बॉलीवूड" सीरिजमधील रणबीर कपूर चांगलाच अडचणीत सापडला आहे. या सीरिजमध्ये त्याचीही एक छोटीशी भुमिका आहे. त्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. थेट मुंबई पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलं आहे. त्यामुळे मुंबई पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शाहरुख खानच्या लेकामुळे रणबीर कपूर अडचणीत; मुंबई पोलीस करणार कारवाई?
Aryan Khan Series Sparks Controversy, Ranbir Kapoor Faces Legal Action Over Vaping Scene
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Sep 23, 2025 | 2:38 PM

आर्यन खान सध्या त्याच्या “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या सीरिजमुळे चर्चेत आहे. ही सीरिजच्या माध्यमातून आर्यनने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून आणि प्रेक्षकांकडून तिला मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळत आहे. यासीरिजमध्ये जितके कॅमिओ आहेत तितकेच त्यात उत्कृष्ट दृश्ये आणि संवाद आहेत.

रणबीर कपूरच्या भूमिकेमुळे वाद 

या सीरिजमध्ये तसे अनेक कलाकार आहे. प्रत्येकाची एक वेगळी कहाणी सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. रणबीर कपूरची देखील एक छोटीशी भूमिका आहे. पण आता त्याच्या भूमिकेतील एका गोष्टीमुळे तो सीन वादाचा विषय बनला आहे. ज्यामुळे थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सीरिजमध्ये रणबीर देखील सिगारेट ओढताना दिसतो

खरंतर, जेव्हा रणबीर कपूर “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या चित्रपटाच्या या सीनमध्ये तो करण जोहर आणि अन्या सिंग या पात्रांना भेटतो. तिघेही एकमेकांशी गप्पा मारतात, पण त्याच दरम्यान रणबीर अन्याला तिचा व्हेप (ई-सिगारेट) मागतो. व्हेप हा एक प्रकारचा ई-सिगारेट आहे ज्यामध्ये निकोटीन द्रव असते. ते सिगारेटइतकेच हानिकारक आहे. सीरिजमध्ये रणबीर देखील सिगारेट ओढताना दिसतो. या सीनदरम्यान पडद्यावर कोणताही इशारा दाखवला गेला नाही. याचाच विरोध राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केला आहे.


मुंबई पोलिसांकडे तक्रार

एका वृत्तानुसार, हा सीन पाहिल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आयोगाने रणबीर कपूर, “बॅड्स ऑफ बॉलीवूड” चे निर्माते आणि नेटफ्लिक्स यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे चित्रण आणि प्रचार केल्याबद्दल त्यांच्यावर ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट कायदा 2019’ अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत.

आर्यन खानच्या पहिल्या मालिकेत लक्ष्य लालवानी, सहेर बंबा, बॉबी देओल, मनोज पाहवा, मनीष चौधरी, रजत बेदी, अन्या सिंग आणि मोना सिंग हे कलाकार आहेत. याव्यतिरिक्त, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, एस.एस. राजामौली, राजकुमार राव, सिद्धांत चतुर्वेदी, अर्जुन कपूर आणि बादशाह यांच्यासह अनेक प्रमुख स्टार्सनी कॅमिओ भूमिका आहेत. दरम्यान 19 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली “बॅड्स ऑफ बॉलीवूड” प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.