नाना पाटेकरांना होती लोकसभेची ऑफर, फडणवीसांसोबत भेट झाली पण…आशिष शेलारांनी सांगितला आठवणीत राहणारा किस्सा!

नाना पाटेकर यांच्या आदरांजली सभेत आशिष शेलार यांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाला दिला आहे. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांनी लोकसभेची ऑफर दिली होती असा खुलासा देखील केला आहे

नाना पाटेकरांना होती लोकसभेची ऑफर, फडणवीसांसोबत भेट झाली पण...आशिष शेलारांनी सांगितला आठवणीत राहणारा किस्सा!
| Updated on: Oct 14, 2026 | 7:43 PM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित आदरांजली सभेत मंत्री आशिष शेलार यांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आठवणीतले नाना’ या भावनेतून आयोजित या सभेत नानांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना आशिष शेलार यांनी त्यांच्यासोबतच्या संवादातील काही खास प्रसंग सांगितले. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती असा महत्त्वपूर्ण किस्सा सांगितला.

नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या संवादाची आठवण सांगताना आशिष शेलार म्हणाले की, त्यांनी नाना पाटेकर यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली होती. यावेळी नाना पाटेकर हे देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांना भेटले होते. त्या भेटीत नानांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.

Loading...

‘मी तुम्हाला पचणार नाही’

‘मी तुम्हाला पचणार नाही,’ असे नाना म्हणाले होते, अशी आठवण आशिष शेलार यांनी सांगितली. नानांचा स्वभाव स्पष्टवक्ता होता. मनात जे असेल ते थेट बोलून दाखवण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळेच त्यांच्या बोलण्यातून अनेकदा त्यांची भूमिका ठामपणे समोर यायची.

‘माझा उपयोग करा रे’, नानांचे शब्द ठरले लक्षात राहणारे

आशिष शेलार यांनी नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या अलीकडच्या संवादाचीही आठवण सांगितली. 6 ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर यांनी ‘माझा उपयोग करा रे’ असे म्हटल्याचा उल्लेख त्यांनी केला. नानांच्या या शब्दांमधून समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची तयारी आणि काम करण्याची इच्छा दिसून येत होती.

नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादाची आठवण सांगताना आशिष शेलार म्हणाले की, त्यांनी नानांना फोन करून मुंबईत कधी येणार, अशी विचारणा केली होती. त्यावर नानांनी आपण 9 ऑक्टोबरला मुंबईत येणार असल्याचे सांगितले होते.

बाप्पानिमित्त त्यांना प्रमाणपत्र द्यायचे होते आणि 9 ऑक्टोबरला कार्यक्रमाचे नियोजन होते. मात्र, त्याआधीच 8 ऑक्टोबरला नाना पाटेकर आपल्यात राहिले नाहीत. त्यामुळे नियोजित भेट होऊ शकली नाही. या प्रसंगाचा उल्लेख करताना शेलार यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला.

रागात बोलले तरी मनाने वेगळे होते नाना

शेलार यांनी नानांसोबतच्या संवादातील आणखी एक प्रसंग सांगितला. नाना कधी रागात बोलायचे, तर कधी अगदी थेट शब्दांत आपली भूमिका मांडायचे. मात्र, त्यांच्यातील मोकळेपणा आणि मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची त्यांची शैली वेगळी होती.

शोकसभेदरम्यान नाना त्यांना म्हणाले होते, ‘तू जास्तच बोलला रे.’ नानांच्या या वाक्यातून त्यांच्या बोलण्यातील मिश्किलपणा आणि समोरच्या व्यक्तीशी असलेला मोकळा संवाद दिसून येतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us