Ashok Saraf: भर कार्यक्रमात मुलाने अशोक सराफ यांचं गुपित सांगितलं; ऐकताच त्याला मध्येच थांबवलं, माधुरी दीक्षितलाही हसू आवरेना

Ashok Saraf: 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ यांच्या स्वभावाविषयी त्यांचा मुलगा अनिकेतने मजेशीर खुलासा केला. ते ऐकून माधुरी दीक्षितसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Ashok Saraf: भर कार्यक्रमात मुलाने अशोक सराफ यांचं गुपित सांगितलं; ऐकताच त्याला मध्येच थांबवलं, माधुरी दीक्षितलाही हसू आवरेना
अनिकेत सराफ, अशोक सराफ आणि माधुरी दीक्षित
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2026 | 11:41 AM

Ashok Saraf: मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आपल्या अभिनयासोबतच विनोदी स्वभावासाठीही ओळखले जातात. त्यांच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. नुकतेच अशोक सराफ यांनी ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी ते हॉटसीटवर बसले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेत सराफसुद्धा उपस्थित होता. कार्यक्रमाची सूत्रसंचालक माधुरी दीक्षितने यावेळी अनिकेतला अशोक सराफ यांच्या स्वभावाबद्दल एक प्रश्न विचारला. त्यावर अनिकेतने असा काही मजेशीर किस्सा सांगितला की, स्वतः अशोक सराफ यांनाच त्याला मध्येच थांबवावं लागलं. हा प्रसंग ऐकून माधुरी दीक्षितसह उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

शाळेच्या पालकसभेला अशोक सराफ जायचे का?

कार्यक्रमादरम्यान माधुरी दीक्षितने अनिकेतला विचारले की, तुझ्या लहानपणी शाळेत पालकांची मीटिंग असायची, तेव्हा अशोक सराफ कधी यायचे का? यावर अनिकेतने दिलेलं उत्तर ऐकून सगळेच हसू लागले. अनिकेत म्हणाला, “मीटिंगमध्ये आणि ते..? दुसऱ्या लोकांबरोबर.. माय गॉड! अशक्य!” त्याचं हे उत्तर ऐकताच अशोक सराफ आणि माधुरी दीक्षित यांनाही हसू आवरलं नाही. अनिकेतने पुढे सांगितले की, त्याच्या मते अशोक सराफ यांना तो, त्याची आई आणि त्यांचा डॉगी यांच्याशिवाय इतर कोणाशीही बोलायला फारसं आवडत नसे. शाळेत काय झालं, हे अनिकेत नंतर वडिलांना सांगायचा. मात्र, त्यावेळी अशोक सराफ यांना आपण कोणत्या वर्गात शिकतो, हेही अनेकदा लक्षात राहत नसे.

Loading...

पहा व्हिडीओ

अनिकेतने सांगितलेला किस्सा आणखी मजेशीर होता. तो म्हणाला, “मी बाबांना शाळेत काय झाले ते सांगायचो. ते मला विचारायचे, तू कितवीत आहेस? आठवीत आहेस की दहावीत? मग मी त्यांना सांगायचो, बाबा मी आता सातवीत आहे. पुढच्या वर्षी आठवीत जाईन. त्यावर ते अच्छा अच्छा ठीक आहे, असं म्हणायचे. तुझी शाळा नीट चालली आहे ना, एवढंच विचारायचे.”

अशोक सराफ यांनी मध्येच थांबवला मुलाचा किस्सा

अनिकेतचा हा मजेशीर किस्सा सुरू असतानाच अशोक सराफ यांनी त्याला मध्येच थांबवले. ‘चला, आपण खेळाकडे वळूयात,’ असं ते म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकताच माधुरी दीक्षितसह उपस्थित सर्वांनाच हसू अनावर झालं. वडिलांचा स्वभाव आणि घरातील मजेशीर आठवणी अनिकेतने अगदी दिलखुलासपणे सांगितल्या. त्यामुळे ‘कोण होणार करोडपती’च्या या भागात प्रेक्षकांना खेळासोबतच अशोक सराफ यांच्या कौटुंबिक आयुष्यातील एक मजेशीर झलकही पाहायला मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us