AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक सराफ अन् त्यांच्या मुलात का निर्माण झालेली दरी? निवेदिता यांनी सांगितलं कारण

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत अभिनयापेक्षा अत्यंत वेगळ्या क्षेत्रात नाव कमावतोय. अनिकेत हा व्यवसायाने शेफ आहे. त्याने फ्रान्समध्ये शिक्षण पूर्ण केलं.

अशोक सराफ अन् त्यांच्या मुलात का निर्माण झालेली दरी? निवेदिता यांनी सांगितलं कारण
अशोक सराफ, निवेदिता सराफ, अनिकेत सराफImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 29, 2025 | 9:36 AM
Share

अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. अशोक यांचं त्यांच्या मुलासोबत नातं कसं आहे, याविषयी निवेदिता ‘मी बहुरुपी’ या अशोक सराफांच्या आत्मचरित्रात मोकळेपणे व्यक्त झाल्या. अनिकेत लहान होता, तेव्हा त्याची वडिलांशी खूप जवळीक होती. त्यावेळी अशोक सराफ त्यांच्या कामात खूप व्यग्र असायचे. तरीसुद्धा वेळात वेळ काढून ते अनिकेतला सायकल चालवायला शिकवायचे. मुलासोबत वेळ घालवता यावा यासाठी ते आवर्जून प्रयत्न करायचे. पण अनिकेत मोठा व्हायला लागला तसतशी त्यांच्यात एक दरी निर्माण झाली. इतकी ही प्रसंगी निवेदिता यांना मध्यस्थाची भूमिका निभावावी लागायची.

अनिकेत आणि अशोक सराफ यांच्यातील संवादही हळूहळू कमी व्हायला लागला होता. अनिकेतविषयी काही बोलायचं असेल किंवा त्याला काही सांगायचं असेल तर अशोक निवेदिता यांच्याशी बोलायचे आणि अनिकेतला त्याच्या वडिलांबद्दल काही बोलायचं असेल तर तोही निवेदिता यांच्याकडेच यायचा. ते दोघं एकमेकांबरोबर संवादच साधू शकत नव्हते, असं निवेदिता यांनी सांगितलं. त्यामुळे मोकळेपणे बोलण्याची गोष्ट तर दूरच राहिली. याला दोघांच्या वयातील अंतर कारणीभूत असावं किंवा त्यांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध असल्याने दुरावा निर्माण झाला असावा असं त्या म्हणाल्या.

अशोक सराफ आणि अनिकेत यांच्यातली ही दरी नंतर हळूहळू बुजलीसुद्धा. एक दिवस अनिकेत त्याच्या वडिलांजवळ जाऊन बसला आणि मग दोघं गप्पा मारू लागले. त्या दोघांच्या नात्यातला गुंता सुटला आणि त्यानंतर दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले. अनिकेतमुळे अशोक सराफही खूप बदलले. तरुण पिढी कसा विचार करते, आपल्यापेक्षा ती किती वेगळी आहे, आपण त्यांना कसं समजून घ्यायला हवं, याची जाणीव त्यांना झाली.

शेफ होण्यासाठी अनिकेतने जेव्हा परदेशात जायचं ठरवलं होतं, तेव्हा तो निर्णय अशोक सराफ यांना फारसा पसंत नव्हता. परंतु आपली मतं आपण आपल्या मुलांवर लादता कामा नये, त्यानं घेतलेल्या निर्णयामुळे तो सुखी होणार असेल तर त्यात आपणही आनंद मानायला हवं, हे आम्हा दोघांनाही समजलंय, असं निवेदिता यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?