Ashok Saraf: माझ्या वाट्याला कधीच… लोकांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफांच्या मनात ‘ती’ सल कायम
Ashok Saraf News: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी एक इच्छा बोलून दाखवली आहे. इतकं काम करुनही काय राहून गेलं हे त्यांनी बोलून दाखवलं आहे.

Ashok Saraf On His Role: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आदी अनंत हा चित्रपट सर्वत्र १२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ही पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ते अनेक ठिकाणी जात आहे. अशातच एबीपी माझा कट्टा या कार्यक्रमात अशोक सराफ यांनी त्यांची एक इच्छा व्यक्त केली आहे.
अशोक सराफ यांनी माझा कट्ट्यावर बोलताना म्हटलं की, “बऱ्याच भूमिका आहेत पण खरा वारसदार नावाच एक चित्रपट केला होता, त्यात एक वेडा असतो, त्याचे लग्न एका चांगल्या मुलीबरोबर होते, असं त्यात दाखवले गेले होते. पहिल्यांदा लेखकानं वेड्या भूमिकेसाठी पल्लेदार वाक्य लिहिलेली. मी म्हटलं वेडा असलेला माणूस पल्लेजार वाक्य कशी बोलू शकेल? तो बोलताना वाक्य बनत नाहीत, वाक्य बनवण्याचा प्रयत्न करतो, असं ते हवं होतं. मी ती वाक्य खोडून टाकली, चांगल्या मुलीच्या सहवासात आल्यानंतर तो सुधारतो, त्याच्यातील डेव्हलपमेंट करताना खूपच मजा आलेली, बरा होत असताना, बरा झाल्यानंतर तचो कसा बोलेल हे त्याच्यात सगळं केलं. तशा प्रकारचा रोल मिळाला फार बरं होईल, असं अशोक सराफ म्हणाले.
बरेच रोल मी केले पण अजूनही बरेच रोल करायचे राहूनच गेले माझ्याकडून, खरा वारसदारमध्ये वेडसर नव्हता, डोक्याला मार लागल्यानं भ्रमिष्ठ झालेली ती भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. मला पत्थर दिल व्हिलन करावा वाटतो, असं अशोक सराफ म्हणाले.सुरुवातीच्या काळात विनोदी व्हिलन केलेला. पंढरीच्या वारीत व्हिलन दगड होता पण क्रूर नव्हता. एखाद्याचे वाईट करावं अशी भूमिका असणारा व्हिलन तो नव्हता. मला बऱ्याच भूमिका करायच्या आहेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
अशोक सराफ यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना गुपचूप सिनेमातील प्रोफेसरच्या पात्राबद्दल, तो सिनेमा कसा मिळाला याबद्दल आठवणीही सांगितल्या. धनंजय माने सिच्युएशनला धरुन कॅरेक्टर आहे. सिच्युएशन ज्याप्रमाणे घडते त्यानुसार ते कॅरेक्टर आहे. गुपचूप गुपचूपमधील प्रोफेसर हे बनवलेलं कॅरेक्टर आहे, अशं अशोक यांनी बोलून दाखवलं आहे.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us