अल्लू अर्जुनच्या घरावर प्रचंड हल्ला, घरात घुसून तोडफोड; दगडफेक, हल्ल्यामागे कुठला पक्ष?

अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंदोलकांनी घरात घुसून तोडफोड केली आहे. दगडफेक, हल्ल्यामागे एका पक्षाचा सहभाग असल्यातं म्हटलं जात आहे.

अल्लू अर्जुनच्या घरावर प्रचंड हल्ला, घरात घुसून तोडफोड; दगडफेक, हल्ल्यामागे कुठला पक्ष?
| Updated on: Dec 22, 2024 | 8:00 PM

Breaking News

अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घरात घुसून तोडफोड

अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंदोलकांनी घरात घुसून तोडफोड केली आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या अनेक सदस्यांनी रविवारी (22 डिसेंबर) अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील निवासस्थानावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आठ सदस्यांना अटक केली. त्यानंतर त्या सर्वांना ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.