
योगगुरु बाबा रामदेव हे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि योग साधनेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. ते सातत्याने योगाचा प्रचार करतात आणि लोकांना निरोगी राहण्यासाठी टिप्स देतात. अशातच अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत त्यांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा केला आणि सांगितले की, जे दिसते तसे असते असे नाही. आता ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या…
शेफाली जरीवालाच्या मृत्यूवर बाबा रामदेव काय म्हणाले?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाबा रामदेव यांना विचारण्यात आले की, शेफाली जरीवाला यांचे वय 42 वर्षे होते आणि सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षांचे होते. सिद्धार्थ हे बॉडी बिल्डर होते, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होते आणि शेफाली जरीवाला देखील अत्यंत फिट होती. त्यांना कोणताही आजार नव्हता, मग असे का घडले? यावर बाबा रामदेव म्हणाले की, “सॉफ्टवेअरमध्ये बिघाड होता. लक्षणे ठीक होती, पण सिस्टम बिघडली होती.” ते पुढे म्हणाले की, आपले शरीर हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरवर आधारित आहे. बाहेरून निरोगी दिसणारी व्यक्ती आतून निरोगी असेलच असे नाही. आतून आपले शरीर मजबूत असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे आणि शेकडो लोकांनी तो लाइक केला आहे.
वाचा: काकीचे पुतण्यासोबत प्रेमसंबंध! काकाने घेतला निळ्या ड्रमचा धस्का, कळताच उचलले खतरनाक पाऊल
शेफाली जरीवाला यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित
‘कांटा लागा’ गर्ल शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत अनेक अहवाल समोर येत आहेत. एका अहवालानुसार, असे सांगितले जात आहे की, तिने उपवासादरम्यान अँटी-एजिंग इंजेक्शन घेतले होते, ज्यामुळे तिला कार्डियक अरेस्ट आला आणि मृत्यू झाला. तर, सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलायचे झाले तर, बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला हा देखील व्यायाम करत होता आणि बाहेरून पूर्णपणे तंदुरुस्त दिसत होता. पण हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. अशा परिस्थितीत योगगुरु बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे की, बाहेरून निरोगी दिसणारी व्यक्ती आतून निरोगी असेलच असे नाही, म्हणून नेहमी आतून निरोगी आणि तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे.