“बॉलिवूड खूप वाईट…” इरफान खानचा लेक बाबिल खान डिप्रेशनमध्ये, रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

इरफान खानच्या मुलाने बाबिल खानने बॉलिवूडमधील कठोर वास्तवतेबाबतचा एक भावनिक आणि रडतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या एकटेपणा आणि तणावाबद्दल बोलताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. अनेक सेलिब्रिटींच्या नावांचाही त्याने उल्लेख केला आहे.

बॉलिवूड खूप वाईट... इरफान खानचा लेक बाबिल खान डिप्रेशनमध्ये, रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
babil khan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2025 | 1:54 PM

बॉलिवूडमध्ये जसे चांगले प्रसंग आणि अनुभव असतात तसे वाईट आणि अनपेक्षित घडलेल्या घटनाही असतात. बॉलिवूडमधील वातावरण सर्वांसाठी एकसारखंच असतं असं नाही. असे अनेक अभिनेते किंवा अभिनेत्री असतात जे डिप्रेशनचे शिकार ठरेले आहेत. तसाच काहीसा प्रकार घडला आहे एका अभिनेत्यासोबत. तो म्हणजे इरफान खानचा लेक बाबिल खान.

बाबिल खानचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल 

दिवंगत सुपरस्टार इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चित्रपटसृष्टीत एकटे पडल्याबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो खूपच तणावात दिसत असून रडतानाही दिसत आहे. तो या व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, “बॉलिवूड खूप वाईट आहे, बॉलीवूड खूप असभ्य आहे.” क्लिपमध्ये बाबिलने शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजित सिंग यांची देखील नावे घेतली आहेत.

“बॉलिवूड खूप फेक आहे”

पुढे बाबिल म्हणताना दिसत आहे, “मला सांगायचंय ते म्हणजे, मी तुम्हाला फक्त एवढेच सांगू इच्छितो की शनाया कपूर, अनन्या पांडे आणि अर्जुन कपूर आणि सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल आणि आदर्श गौरव आणि अगदी… अरिजीत सिंग सारखे लोक आहेत? अशी अनेक नावे आहेत. बॉलिवूड खूप वाईट आहे. बॉलिवूड खूप असभ्य आहे.” असं म्हणत तो त्याच्या मनातील खदखद बाहेर काढताना दिसत आहे.

बाबिलने तो व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ते आता हटवण्यात आले आहे. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.

 

another part of the story babil had put
byu/Anxious_Scratch2449 inBollyBlindsNGossip


नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा 

एका युजरने म्हटलं आहे की, “देवा, हे खरोखरच दुःखद आहे. तो खूप त्रास सहन करत आहे,” तर एका युजरने लिहिले आहे की, “काहीतरी घडले आहे. तो वडिलांशिवाय अतिशय स्पर्धात्मक वातावरणात असुरक्षित आहे. मला आशा आहे की त्याला मदत मिळेल, पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन परत येईल.”

His PR is gonna have a hard time tomorrow
byu/Anxious_Scratch2449 inBollyBlindsNGossip


अनन्या पांडेची एक गूढ पोस्ट व्हायरल 

दरम्यान, अनन्या पांडेची एक गूढ पोस्टही सध्या सोशल मीडियावर समोर आली आहे, ज्यामध्ये ती तिच्या “अलीकडील आयुष्यातील” काही आठवणी इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसत आहे. तिने लिहिले होते की, “जे येणार आहे ते येईल आणि जेव्हा ते येईल तेव्हा आपण त्याचा सामना करू.” तथापि, चाहते ते बाबिल खानच्या व्हायरल व्हिडिओशी या व्हिडीओचा संबंध जोडतानाही दिसत आहेत. तसेच एका आठवड्यापूर्वी बाबिल खानने त्याच्या वडिलांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तो भावनिक होताना दिसला होता.